Bay -team aavaj marathi
विजय जी चोपडा जेष्ठ पत्रकार नांदगाव (नाशिक)
नांदगाव येथील श्री. एम.जे.कासलीवाल एज्युकेशन ट्रस्ट संचलित सौ. क.मा.कासलीवाल प्राथमिक विद्यालयात 8 फेब्रुवारी रोजी पाककृती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. पाककृती स्पर्धेचे उदघाटन सौ. काळे मॅडम,भालेराव मॅडम,शिंदे मॅडम, काकळीज मॅडम, प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक विशाल सावंत यांच्या हस्ते करण्यात आले.
सर्व माता पालकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला पोषण मूल्याचे जोपासना करून तृणधान्य, कडधान्य, तसेच विविध पालेभाज्या पासून पाककृती बनविण्यात आल्या होत्या. ही स्पर्धा घेण्याचा उद्देश विद्यार्थ्यांच्या जेवणात पोषण मूल्य व हिरव्या पालेभाज्यांचा समावेश असावा. या विषयी श्रीमती देवरे मॅडम यांनी माहिती सांगितली.
विविध पाक कृतीतून विद्यार्थी आवडीने सर्व पदार्थ खातील अतिशय रुचकर तयार करण्यात आले होते व सजावट सुद्धा अतिशय उत्तम होती या स्पर्धेत प्रथम क्रमांक पल्लवी खैरनार द्वितीय क्रमांक मिसबा शेख तर तृतीय क्रमांक माधुरी शिंदे यांनी पटकवला.
संस्थेचे चेअरमन मा. सुनीलकुमार जी कासलीवाल तसेच उपाध्यक्ष सुशील कासलीवाल, सचिव विजय चोपडा,प्रशासक प्रकाश गुप्ता ,सहसचिव प्रमिलाताई कासलीवाल,विश्वस्त रिखबचंद कासलीवाल, जुगलकिशोर अग्रवाल, महेंद्र चांदिवाल, आनंद कासलीवाल यांनी पाककृती स्पर्धेतील विजेत्या माता पालकांचे तसेच सर्व शिक्षकांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
सदर पाककृती स्पर्धा यशस्वी करण्यासाठी श्री. सिद्धार्थ जगताप,अभिजीत थोरात, तुषार जेजुरकर, श्रीमती. धन्वंतरी देवरे, निलोफर पठाण, वैशाली शिंदे,जयश्री पाटील, निशिगंधा शेंडगे, जयश्री कुमावत, पुनम खोंडे,अर्चना बोरसे.यांनी विशेष मेहनत घेतली.

0 Comments