स्त्रीभ्रूण हत्या टाळा , पैशाचा सदुपयोग करा -हभप पुरुषोत्तम महाराज

 Bay- team aavaj marathi 

दिवसेंदिवस मुलींची संख्या कमी होत आहे, मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या ४०% कमी आहे,स्त्रीभ्रुन हत्या करु नका मुलगी दोन कुळांचा उध्दार करते.लग्न झालेल्या मुलींनी गरोदर पणामध्ये आराम न करता किमान आपल्या घरातील कामकाज करावे, शारीरिक व्यायाम गरजेचा असतो.असे हभप पुरुषोत्तम महाराज रविवार दि.९ रोजी २५ वर्षांपासून सुरू असलेल्या नांदगाव तालुक्यातील चंदनपुरी ग्रामदेवता श्री काळा गणपती देवस्थान येथे अखंड हरिनाम सप्ताहाच्या काल्याच्या किर्तनात उपस्थित स्त्रोत्यांना किर्तनातून प्रबोधन करताना म्हणाले.

गणेश जयंती पासून सुरुवात झालेल्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या हभप पुरुषोत्तम महाराज यांच्या काल्याच्या किर्तनाने सांगता करण्यात आली. यावेळी ते पुढे म्हणाले की तरुणांनी व्यसनाधीनते पासून दुर रहावे कमावलेल्या पैशाचा सदुपयोग करावा.

मांसाहार टाळा शाकाहारी अन्न ग्रहण करा,सकस आहार घ्यावा हायब्रीड अन्नामुळे विविध आजार होत आहे, अल्प वयात मुलांना हृदयविकाराचा झटके येत आहे. कॅन्सर सारखे आजार होत आहेत.दिवसेंदिवस वृध्द आश्रमांची संख्या वाढत चालली आहे, हे लक्षण चांगले नाही, महाराष्ट्रासाठी निश्चितच अपमानास्पद बाब आहे.

असे ते शेवटी म्हणाले.यावेळी चंदनपुरी आणि पंचक्रोशीतील हजारो भाविक स्त्रोते उपस्थित होते. या सप्ताह निमित्त सात दिवस ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण वाचन तसेच विविध नामांकित महाराजांचे किर्तन व प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते, कार्यक्रमाची सांगता महाप्रसादाचे वितरण करून करण्यात आली.











 







Post a Comment

0 Comments