Bay -team aavaj marathi
स्पेशल रिपोर्ट
नांदगाव तालुक्यातील जातेगाव च्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला, येथील अत्यल्प भु धारक शेतकरी मुक्तार सुपडु शेख यांची मुलगी सानिया (वय २०) हिने आपल्या वडिलांनी दिड एकर शेती आणि दुधाचा जोड व्यवसाय करुन हलाखीची आर्थिक परिस्थिती असताना वडिलांना आर्थिक हातभार लागावा हा दृष्टिकोन ठेवून जिद्द आणि चिकाटीने आपल्या वयाच्या सोळाव्या वर्षापासून इयत्ता दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर सैन्य दलामध्ये व वन विभागात व पोलिस दलात नोकरी साठी प्रयत्न केले, अखेर मुंबई पोलीस दलातील भरतीमध्ये यशस्वी झाली.-----------------------------------------------------------
नोकरीला विरोध करणार्या नातेवाईकांचे अभिनंदनाचे फोन
मुंबई पोलीस दलात माझ्या मुलीची निवड झाली हा मेसेज मोबाईल वर आल्यावर तीने आपल्या परिवारातील सदस्यांना माहिती दिली. हा हा म्हणता ही वार्ता गावात समजली, गावातील तरुणांनी सानीया चा फोटो मोबाईल स्टेटसला ठेवून आणि प्रत्यक्ष भेटून अभिनंदन केले.नोकरी करण्यासाठी विरोध करणार्या नातेवाईक देखील तीला फोन करून अभिनंदन करत असल्याचे तीची आई रुबीना यांनी यावेळी सांगितले.
-----------------------------------------------------------------
जिद्द आणि चिकाटीने प्रयत्न केले तर नक्की यश मिळेल
यावेळी बोलताना सानीया शेख स्वता:चे उदाहरण देताना म्हणाली की, प्रत्येक तरुण -तरुणींनी आपल्या आई वडिलांचे कष्ट नजरेसमोर ठेवून त्यांना शक्य तितकें लवकर त्यांच्या खांद्यावरचा आर्थिक भार कमी होईल. यासाठी ध्येय नजरेसमोर ठेवून अभ्यास केला आणि शारीरिक परिश्रम घेतले तर निश्चितच यश मिळेल असे मनोगत व्यक्त केले.
सानीया मुक्तार शेख मुंबई पोलीस
0 Comments