Bay -team aavaj marathi
मारुती जगधने जेष्ठ पत्रकार नांदगाव (नाशिक)
नांदगांव बाजार समितीचे उपसभापती पदी मंगळवार दि ११ रोजी अनिल साहेबराव सोनवणे यांची बिनविरोध निवड झाली. बाजार समितीचे उपसभापती दिपक सुर्यभान मोरे यांनी आवर्तन पध्दतीने राजीनामा दिल्याने बाजार समितीच्या कार्यालयात आज रोजी उपसभापती पदाच्या निवडीसाठी नांदगांव चे सहाय्यक निबंधक चंद्रकांत विघ्ने यांचे अध्यक्षतेखाली विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी उपसभापती पदासाठी अनिल साहेबराव सोनवणे रा. बोलठाण यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक निबंधक चंद्रकांत विघ्ने यांनी जाहिर केले.
त्यांच्या नामनिर्देशन पत्रावर संचालक अर्जुन पाटील यांनी सुचक तर संचालक एकनाथ सदगीर यांनी अनुमोदक म्हणून सही केली.उपसभापती निवडीपूर्वी संचालक मंडळाची शिवनेरी सभागृह येथे बैठक होवून संस्थेचे मार्गदर्शक तथा आमदार सुहास(आण्णा) कांदे व जेष्ठ नेते बापूसाहेब कवडे,यांच्या सुचनेनुसार अनिल सोनवणे यांचे नावावर एकमत झाले. त्यानंतर निवडणूक प्रक्रिया पार पडली.
अनिल सोनवणे यांचे निवडीचे आमदार सुहास आण्णा कांदे, जेष्ठ नेते बापूसाहेब कवडे, माजी सभापती तेज कवडे आदिंनी अभिनंदन केले आहे. यावेळी माजी सभापती तेजदादा कवडे, विलास भाऊ आहेर, अर्जुन (बंडु) पाटील, मजूर फेडरेशन संचालक प्रमोद भाबड, बाजार समितीचे सभापती दर्शन आहेर, संचालक साहेबराव पगार , सतिष बोरसे दिपक मोरे, जीवन गरुड, पोपट सानप,अनिल वाघ, अलका ताई कवडे, मंगला काकळीज, अमोल नावंदर, यज्ञेश कलंत्री, निलेश इपर, सचिव अमोल खैरनार, युवा सेना तालुका प्रमुख सागर हिरे,किरण देवरे, राजाभाऊ जगताप, प्रकाश शिंदे, दत्तात्रय निकम, प्रभाकर कवडे, पुंजाराम जाधव, अभिमान कवडे, बाबासाहेब भिलोरे, विलास गायकवाड, संजू फणसे, नंदू खरात, सुकदेव कवडे, बापूराव माळी कैलास चोळके,बाळासाहेब कवडे, गुलाब चव्हाण, संतोष गायकवाड, एन. के. राठोड, यांच्यासह संजय पवार, संजय बोरसे, विनोद पवार, आदिवासी महादंड नायक संघाचे बाळासाहेब मोरे, संजय सोनवणे , कैलास सोनवणे , रमेश दळवी , विलास पवार, नवनाथ मोरे, ज्ञानेश्वर सोनवणे यांचेसह तालुक्यातील ग्रामस्थ, शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments