नांदगाव शहरातील रेल्वे भुयारी मार्गाचे लवकरात लवकर रुंदीकरण करण्यात यावे अशी मागणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास अण्णा कांदे यांनी विभागीय व्यवस्थापक भुसावळ विभाग यांना पत्राद्वारे केली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, शहरातून मध्य रेल्वे लाईन गेल्यामुळे शहराचे दोन भाग झाले असून शहराच्या दोन्ही भागांना जोडण्यासाठी व नागरिकांना शालेय विद्यार्थ्यांना येजा करण्यासाठी भुयारी मार्ग अंडर पास तयार करण्यात आला आहे परंतु सदर भुयारी मार्ग अत्यंत छोटा असल्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होऊन अनेक वेळा मार्ग बंद होत असतो तसेच पावसाळ्याच्या कालावधीत या भुयारी मार्गात पाणी साचून देखील मार्ग बंद होत असतो यामुळे पायी चालणाऱ्या नागरिकांना व शालेय विद्यार्थ्यांना तसेच छोटे वाहनधारकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे त्याकरता या भुयारी मार्गाचे अंडर पासचे रुंदीकरण करण्यात यावे अशी नागरिकांची मोठ्या प्रमाणात इच्छा असून नांदगाव शहरातील रेल्वे भुयारी मार्गाचे लवकरात लवकर रुंदीकरण करण्यात यावे अशी मागणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास अण्णा कांदे यांनी विभागीय व्यवस्थापक भुसावळ विभाग यांना पत्राद्वारे केली आहे.
नांदगाव शहरांमध्ये झालेल्या रेल्वे भुयारी मार्गात अनेक वेळा ट्राफिक जाम होऊन नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतो या व्यतिरिक्त पायी येणाऱ्या जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिक किंवा विद्यार्थ्यांनाही मोठा त्रास सहन करावा लागतो याव्यतिरिक्त पर्यायी रस्ता नसल्यामुळे या परिस्थितीतून त्यांना जावेच लागते, रेल्वेने नागरिकांच्या सोयीसाठी तयार केलेला भुयारी मार्ग मात्र नागरिकांना त्रासदायक ठरत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात या मार्गाचे रुंदीकरण करण्याची मागणी नागरिकांकडून येत असल्या मुळे सुहास आण्णा कांदे यांनी रेल्वे वरिष्ठांना पत्राद्वारे सदर मागणी केली आहे.
0 Comments