Bay- team aavaj marathi
विजय जी चोपडा जेष्ठ पत्रकार नांदगाव (नाशिक)
नांदगाव येथील सौ.क.मा.कासलीवाल माध्य.विद्यालयात इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना आज निरोप देण्यात आला. शालेय जीवनातील हा शेवटचा दिवस असल्याने सर्व विद्यार्थी या प्रसंगी भावूक झालेले दिसून आले.आपले मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांनी शाळेविषयी व शिक्षकांविषयी कृतज्ञतेची भावना व्यक्त केली. यशवंत शिंदे,अनीस शेख,ओम खैरनार व पूनम वाबळे या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. शिक्षक मनोगतात दहावीचे वर्गशिक्षिक संजय शिवदे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.तसेच परीक्षा कालावधीत आरोग्याकडे लक्ष द्यावे असे सांगितले.
तसेच रिझवान मन्सुरी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना जीवनात यशस्वी होण्याबरोबरच चारित्र्य संवर्धनाकडे लक्ष द्यावे असा संदेश दिला. विद्यालयाचे मुख्याध्यापक शरद पवार यांनी आपले मनोगत व्यक्त करताना जिद्द, चिकाटी व कष्ट करून यशाचे शिखर गाठावे असे आवाहन केले .जे.टी.कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूल चे प्रिन्सिपॉल मनी चावला यांनीही परीक्षेमध्ये व जीवनात यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
संस्थेचे सचिव विजय चोपडा यांनी देखील याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांनी अभ्यास करून आई वडिलांचे व शाळेचे नाव मोठे करावे असे आवर्जून सांगितले. या कार्यक्रमास संस्थेचे चेअरमन मा. सुनीलकुमार जी कासलीवाल तसेच उपाध्यक्ष सुशील कासलीवाल, सचिव विजय चोपडा, प्रशासक प्रकाश गुप्ता ,सहसचिव प्रमिला ताई कासलीवाल,विश्वस्त रिखबचंद कासलीवाल,जुगलकिशोर अग्रवाल, महेंद्र चांदिवाल, आनंद कासलीवाल, प्रिन्सिपॉल मनी चावला, मुख्याध्यापक सर्वश्री शरद पवार, गोरख डफाळ, तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समृद्धी राऊत व लावंण्या नेमणर यांनी तर केतन दळवे यांनी आभार व्यक्त केले.
0 Comments