Bay -team aavaj marathi
प्रज्ञानंद बापू जाधव पत्रकार नांदगाव (नाशिक)
नांदगाव पासुन जवळच असलेले गंगाधरी येथील आश्रम शाळेतील मतिमंद मुलांना जीवनावश्यक साहित्य वाटप करण्यात आले. बुधवार दि ५.रोजी स्वर्गवासी वाल्मिक बाबुराव सानप यांचा १५ वा स्मृतिदिनाचे निमित्ताने नांदगाव येथील निवासी मतिमंद विद्यालयातील वंचित उपेक्षित मतिमंद मुलांना थंडी पासून संरक्षण व्हावे तसेच त्यांचा शैक्षणिक व बौद्धिक विकास निरंतर चालू रहावा यासाठी शहरातील तरुण युवक सानप बंधू यांनी सामाजाचे आपण काही तरी देणं लागतो या विचाराने संतोष सानप,सुभाष सानप मंगेश सानप या तिन्ही शिक्षित बंधूनी आपल्या आईला सोबत घेऊन वडीलांच्या संस्कार न विसरता त्यांच्या आठवणींना उजाळा देत,आश्रम शाळेतील मतिमंद मुलांना शाळेतील प्रांगणात अल्पोपहार देवून उबदार कपडे आई मंदाबाई सानप यांच्या हस्ते भेट दिले.
आई वडिलांचे लहानपणी दिलेले संस्कार नातवंड यांच्यावर देखील कायम राहण्यासाठी विचारांशी एक होऊन सानप बंधुनी वडिलांच्या या १४ व्या पुण्यस्मरण अविस्मरणीय क्षणाला उजाळा दिला. स्व वाल्मिक बाबुराव सानप हे रेल्वेचे निष्ठावान कर्मचारी म्हणुन त्यांची चांगलीच ओळख होती. ते आपल्या कामाशी कायम एकनिष्ठ प्रामाणिक राहिले होते कार्यालयात काम करत असतांना कर्मचारी लोकांना मुलभूत हक्क अधिकारांची जाणीव त्यांनी करून दिली होती केंद्र सरकार यांचे सेवक असतांना परिसरातील अनेक प्रश्नांना वाचा देखील फोडली. आणि कामांना न्याय मिळून दिला.गरिब, गरजू लोकांच्या हिताला प्रथम प्राधान्य देऊन त्यांची दिवसांची सुरुवात असायची असे त्यांच्या सोबत असलेले मित्र परिवार यांनी कथन केले.
0 Comments