अध्यात्मिक क्षेत्रात पुढे जाण्यासाठी संन्यास स्विकारणे गरजेचे त्यागमूर्ती सुश्राविका सरलाबेन दुगड

 Bay- team aavaj marathi 

हेमराज वाघ सर पत्रकार न्यायडोंगरी नांदगाव (नाशिक)

नांदगाव तालुक्यातील न्यायडोंगरी तेथील मुमुक्षू सौ.सरलाबेन दुगड ह्या जैन भागवती दीक्षा घेत आहे. त्यानिमित्त  गावातून आज भव्य सवाद्य शोभायात्रा (वरघोडा) काढण्यात आली. यावेळी भगवान महावीरांच्या गजराने संपूर्ण परिसर दुमदुमला. मुमुक्षू सौ.सरलाबेन ह्या सुमतीलाल दुगड यांची धर्मपत्नी आणि जवरीलालजी श्रीश्रीमाळ नैताळा यांची सुकन्या आहेत. दीक्षा घेणाऱ्या मुमुक्ष सौ. दुगड आणि मुमुक्ष बाल ब्रह्मचारी शिवानीबेन हिरण - मनमाड यांची जैन स्थानकापासून संपूर्ण गावात शोभायात्रा काढण्यात आली. यानिमित्त सुमधुर संगीतमय भक्ती संध्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते.

यावेळी अनेक तरुणांनी वेशभूषा, सरलाबेन यांच्या जीवनावर आधारित नाटिका , गायन अशा अनेक विविध कलागुणांचा अविष्कार सादर केला. तसेच दीक्षार्थी मुमुक्ष सौ.सरलाबेन सुमतीलाल दुगड - न्यायडोंगरी व मुमुक्ष बालब्रह्मचारी शिवानीबेन हिरण - मनमाड यांचे स्वागत व सकल जैन समाज न्यायडोंगरी यांच्यातर्फे सन्मानपत्र देण्यात आले. धुळे येथील प. पू.१००८ लक्षण से संपन्न उत्तमचंदजी मा.सा. यांच्या शुभ हस्ते ७ फेब्रुवारी रोजी सरलाबेन जैन भागवती दीक्षा घेणार आहे. यावेळी राज्यभरातून मोठ्या संख्येने जैन बांधव धुळे येथे होणाऱ्या भव्य दीक्षा समारंभ कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत.

भौतिक संसारिक सुख सुविधांचा त्याग करून आध्यात्मिक जगतामध्ये प्रवेश करीत आहे. या अनुषंगाने २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी छत्रपती शिवाजी महाराज चौक , श्रीराम मंदिर पटांगण व आदिवासी अनुदानित आश्रम शाळा न्यायडोंगरी येथे सरलाबेन यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले आहे.तसेच संभाजी चौक न्यायडोंगरी गणपती मंदिर ,बाप्पा मोरया ग्रुप व सकल जैन समाजातर्फे सत्कार करण्यात आलेला आहे.

या शोभायात्रा (वरघोडा) वेळी नांदगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार सुहास अण्णा कांदे, पंचायत समिती माजी सभापती विलासराव आहेर यांच्यासह सर्व समाजातील प्रतिष्ठित , राजकीय, शैक्षणिक , धार्मिक क्षेत्रातील प्रतिष्ठित नागरिक,जैन नवयुवक मंडळ, दीक्षा महोत्सव समिती, सर्व न्यायडोंगरी तील जैन माहेरवासी बहिणी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.यावेळी सर्व जैन बांधवांनी स्वयंप्रेरणेने आपला व्यापार एक दिवसासाठी बंद ठेवलेला होता.
लहानपणापासूनच जैन धर्माची गोडी होती लग्न झाल्यावर पहिल्याच वर्षे प.पू चंचलाजी म.सा., प.पू.समिताजी म.सा. आदीठाणा यांचा धर्ममय चातुर्मास होता. त्यावेळी माझ्यासाठी सर्व काही नवीन होतं. माझे सासरे दूरधर्म प्रेमी होते ते मला स्थानकात जाण्यासाठी प्रोत्साहन द्यायचे. धर्मचर्चा , प्रतिक्रमण यामध्ये मला पण गोडी लागली २००७ मध्ये मी स्वाध्याय शिबिर उमराणा येथे गेले तेव्हा मला तिथे धोवन पाठाचे महत्व समजले व तेथूनच मी निश्चय केला की जीवांना अवधान देणार व शपथ घेतली. यानंतर माझ्या पोटी लोकेश नामी रत्न जन्मले त्याने तर इ.४ थी मध्ये असताना पुच्छीसुमन, प्रतिक्रमण,१२५ बोल पूर्ण केले त्यावेळी प.पू.संगीताजी मा.सा यांचा चातुर्मास चालू होता त्यांचे प्रेरणेने लोकेश मध्ये संस्कारा ची अधिक भर पडली. मी तर त्याला संयमाचा मार्ग दाखवला माझ्या मनात इच्छा होती की , तो देखील संयम घेईल व त्याच्यासोबत मीही संयम येईल पण असे घडले नाही. जोपर्यंत आपण किल्ल्याच्या पायथ्याशी असतो तोपर्यंत आपल्याला त्याचा भार जाणवतो जसे जसे चढत जातो तसे मार्ग सोपा होत जातो तसाच मी पण निश्चय केला व हळूहळू त्यागाची भावना वाढवली. घरात सर्व सुख ,संपत्ती व ऐश्वर्य नांदत असताना मी हळू - हळू एक एक गोष्टीचा त्याग करत गेले.भ. महावीरांनी सांगितले की शरीर निरोगी आहे आणि घरात सगळ्या वस्तू असताना आपण त्या वस्तूचा त्याग करणे म्हणजे संयम असतो. 


यानंतर ही मनाचा दृढ निश्चय करून संकल्प केला की , सन २०१९ मध्ये दीक्षा घ्यावी यासाठी मी आज्ञा मागितली पण घरच्यांकडून मला नैराश्य भेटले पण त्यातून मी खचले नाही अजून स्वतःमध्ये धर्माला उतरवले या मोहमायारूपी दुनिया से लढा देत राहिली. यानंतर प्रत्येक वर्षी १५ ते २० दिवस गुरुचरणी यांच्या सेवांमध्ये राहत होती सतत धर्मकार्य यामध्ये सहभाग घेत होते. सन २०२१ मध्ये न्यायडोंगरी येथे प.पू. संगिताजी मा.सा. यांचा होळीचा चातुर्मास होता. त्यावेळी संपूर्ण कुटुंबांला स्थानकात बोलून मी त्यांना विनंती केली , मोह त्यागाची पण चि. लोकेश याने ०३ वर्ष थांबण्यास सांगितले. या कालावधीत मी खूप काही मर्यादा केल्या धर्म क्रियेमध्ये दृढ झाली परत हिम्मत करून मी घरच्यांसमोर प्रस्ताव ठेवला पण नंदा च्या मुलाच्या लग्नाची गडबड होती म्हणून पुन्हा उशीर झाला.
१ जानेवारी रोजी पुन्हा संपूर्ण कुटुंबासह मालेगाव येथे गुरूणींची सेवा करून घरच्यांसमोर प्रस्ताव ठेवला तेव्हा महात्मांनी घरच्यांची समजूत काढत जर ६ महिने थांबले तर चातुर्मास सुरू होईल व पूर्ण १ वर्ष निघून जाईल आणि सरला बेन यांची त्यामुळे वृत्ती बघून त्या घरी राहण्यासारखे नाही तेव्हा घरच्यांनी परत विचार केला या संयमामध्ये मोठी सहाय्यक म्हणजे माझी थोरली जाऊ त्या बोलल्या मी सेवा धर्म स्वीकारणार आणि चि. लोकेश चा पण होकार आला. असे मनोगत मुमुक्षू सौ. सरलाबेन दुगड यांनी व्यक्त केले.

 

Post a Comment

0 Comments