किसान माध्यमिक विद्यालयात रथसप्तमी निमित्ताने सूर्य नमस्कारांचे आयोजन

 Bay- team aavaj marathi

भारत देवरे -वाखारी, नांदगाव (नाशिक)

 नांदगाव तालुक्यातील वाखारी येथील  किसान माध्यमिक विद्यालयात दि. ४ फेब्रुवारी रोजी रथसप्तमी निमित्ताने सूर्यनमस्कारांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास विद्यालयाच्या शालेय समितीचे अध्यक्ष विजय चोपडा हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी या उपक्रमाचे कौतुक केले आणि विद्यार्थ्यांनी शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी नियमितपणे सूर्यनमस्कार करावे असे आवाहन केले. एकूण २३७ विद्यार्थ्यांनी सूर्यनमस्कार घातले.

यावेळी प्र. मुख्याध्यापक सुनील हिंगमीरे यांनी शालेय समिती अध्यक्ष विजय चोपडा यांचे स्वागत केले. सूर्यनमस्कार घातल्यानंतर जनजाती कल्याण आश्रम मदतनिधी साठी जास्तीत जास्त योगदान देणाऱ्या वैष्णवी जालगुंडे, कीर्ती जगताप, श्रद्धा जालगुंडे या विद्यार्थिनींचा अध्यक्षांचे हस्ते स्कुल बॅग बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला.विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक नंदू दवांगे यांनी मार्गदर्शन केले. सूर्यनमस्कार मंत्राचे वाचन ऋषीकुमार डोमाडे, सूत्रसंचालन रत्नप्रभा पाटील यांनी केले



याप्रसंगी शाळेच्या स्टेज वर डोम तयार करण्यासाठी मा. शालेय समिती अध्यक्ष विजयजी चोपडा यांनी स्वतः पंधरा हजार देणगी जाहीर केली, प्र. मुख्याध्यापक सुनील हिंगमीरे यांनी दहा हजार रुपये देणगी या कामासाठी जाहीर केली असून लवकरच काम मार्गी लावणार असल्याचे अध्यक्षांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या यशस्वीपणे पार पाडण्यासाठी मुख्याध्यापक सुनील हिंगमीरे यांचे मार्गदर्शनाने रोहिणी गोराडे, ज्योत्स्ना चव्हाण, दिलीप भडांगे, योगेश कुलकर्णी, प्रशांत वाघ यांनी प्रयत्न केले.
 





Post a Comment

0 Comments