गंगागिरीजी महाराज मंदिराच्या अकराव्या वर्धापन दिनानिमित्त पारायण सोहळ्याचे आयोजन

 Bay- team aavaj marathi 

नांदगाव तालुक्यातील जातेगाव पासून उत्तरेस सात किलोमीटर अंतरावर सह्याद्री पर्वत रांगेच्या शिखरावर असलेल्या श्री पिनाकेश्वर महादेव देवस्थानाच्या ठिकाणी गंगागिरीजी महाराज यांच्या मंदिराच्या आणि मुर्ती प्राणप्रतिष्ठापनेच्या ११ व्या वर्धापन दिनानिमित्त सालाबादप्रमाणे यंदाही तीन दिवसांचा अखंड हरिनाम सप्ताह आणि नवनाथ ग्रंथ पारायण सोहळ्याचे जातेगाव आणि पंचक्रोशीतील भक्त मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे.

या सोहळ्याची सुरुवात पुढील आठवड्यात सोमवार दिनांक १० फेब्रुवारी होत आहे. या निमित्ताने गुरुवार दिनांक १३ पर्यंत दररोज सकाळी सहा ते सात वाजेपर्यंत सामुहिक शिव विधी सकाळी आठ ते पाच वाजेपर्यंत नवनाथ ग्रंथ वाचन, सायंकाळी सहा ते सात वाजेपर्यंत हरीपाठ, हरी जागर आणि शिव सत्संग होणार आहेत. त्याचप्रमाणे गुरुवारी सकाळी सात ते नऊ वाजेपर्यंत जातेगाव येथे भव्य दिंडी सोहळा आयोजित करण्यात आला असून प.पु महंत स्वामी रामप्रकाशानंद गिरीजी महाराज यांच्या काल्याच्या किर्तनाने आणि महाप्रसादाचे वितरण करून कार्यक्रमाची सांगता करण्यात येणार आहे. असे आयोजक समितीच्या वतीने कळविण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments