Bay- team aavaj marathi
मारुती जगधने जेष्ठ पत्रकार नांदगाव (नाशिक)
नांदगाव नगरपालिकेची नागरिकांकडे असलेली थकीत घरपट्टी पाणीपट्टी वसुली साठी अशा करदात्यांना वारंवार पालिकेचे थकीत विविध कर मागणी करुन सुध्दा प्रतिसाद देत नसलेल्या नागरिकांच्या घर किंवा दुकानासमोर ढोल वाजवून थकबाकी मागणी करण्याचे ठरविले असून त्यासाठी ढोल पथकाची नेमणूक करण्यात आली असल्याचे समजते.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, येथील अनेक नागरिकांनी नगरपालिकेचे असलेले विविध कर मागणी करुन सुध्दा त्यांच्याकडे असलेली थकबाकी भरण्यासाठी प्रतिसाद देत नसलेल्या नागरिकांच्या घरासमोर ढोल वाजवून थकबाकी मागणी करण्याचे ठरविले आहे. तसेच ज्या थकबाकी धारक नागरिकांनी थकीत कर वेळेत न भरल्यास संबंधित मालमत्ता धारकांवर कायदेशीर कारवाई होऊ शकते. त्यासाठी नगरपालिकेकडून थकबाकीदारांना कर भरण्यासाठी नोटीस बजावण्यात आल्या आहेत.
त्याचप्रमाणे ठराविक कालावधीत कर न भरल्यास दंड आणि व्याज लागू होते. कर न भरल्यास मालमत्ता जप्त किंवा लिलाव करण्याची कारवाई केली जाऊ शकते. काही प्रकरणांत पाणीपुरवठा किंवा इतर सुविधा बंद करण्याची शक्यता आहे.तरी नागरिकांनी नगरपालिकेला सहकार्य करुन थकीत कर वेळेत भरावी किंवा नगरपालिका कार्यालयात जाऊन हप्त्याने भरण्याची व्यवस्था करावी जेणेकरून कारवाई टळेल,असे आवाहन करण्यात आले आहे.
0 Comments