तक्रारदार पुरुष वय ३३ वर्षे यांची चांदवड तालुक्यातील तळवाडे येथील शेतजमीन असून त्याचे ७/१२ उतार्यावर वारसा हक्काने हिस्सा वाटणी झालेल्या उताऱ्यावर नोंद लावून देण्याच्या मोबदल्यात येथील तलाठी विशाखा भास्कर गोसावी ,वय ३७ वर्षे , व्यवसाय- नोकरी तलाठी, शेलु सजा यांनी खाजगी मध्यस्थी करणारे ज्ञानेश्वर एकनाथ बरकले वय ३४ वर्षे, व्यवसाय- खाजगी एजंट रा.परसुल ता. चांदवड, यांच्या मध्यस्थीने दि.३ मार्च रोजी तक्रारदार शेतकरी यांच्या कडून ८ हजार रुपयांची मागणी केली असता, ७/१२ उतार्यावर वारसाहक्काने हिस्सा वाटणीने नाव लावून देणे कामी तडजोडी अंती ४००० रुपयाची लाच पंचासमक्ष स्विकारली. म्हणून आरोपी क्र. एक व दोन यांचे विरुध्द रंगेहाथ पकडण्यात आले. यावेळी त्यांची झडती घेतली असता दोघांकडे मोबाईल आढळून आले होते.
वरील कारवाई ला.प्र.वि,नाशिक परीक्षेत्र च्या पोलीस अधीक्षक मा.श्रीम. शर्मिष्ठा घारगे- वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपाधीक्षक श्री.संतोष पैलकर, सह अधिकारी श्रीम.स्वाती पवार. पोलीस उपअधीक्षक ला.प्र.वी नाशिक व पो.हे.कॉ./दिनेश खैरनार, अविनाश पवार चालक-पोलीस शिपाई परशुराम जाधव यांनी यशस्वी सापळा रचून महिला तलाठ्यासह मध्यस्थी करणार्यास रंगेहाथ कडून चांदवड पोलीस स्टेशन, येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ चे कलम ७ अ ,१२ अन्वये गुन्हा दाखल केला. वरील प्रकरण हे महसूल विभागाच्या निगडित असल्याने यांचे सक्षम अधिकारी साहेब मा.जिल्हाधिकारी, नाशिक यांना कळविण्यात आले आहे.
0 Comments