नांदगाव नगर पालिकेच्या कर वसुली मोहीमेत एक मालमत्ता सील

 Bay- team aavaj marathi 

मारुती जगधने जेष्ठ पत्रकार नांदगाव (नाशिक)

नगरपालिका आपल्या कार्यक्षेत्रातील नागरी सुविधा पुरवण्यासाठी विविध प्रकारचे कर वसूल करते. या करांद्वारे पालिकेला महसूल मिळतो, जो पाणीपुरवठा, रस्ते, सार्वजनिक आरोग्य, शिक्षण, कचरा व्यवस्थापन यांसारख्या नागरी सुविधांसाठी वापरला जातो. या संदर्भात नोंदवा नगरपालिकेने कर वसुली संदर्भात जप्तीची धडक मोहीम सुरू केले आहे. नागरिकांनी तात्काळ कर भरावे अन्यथा आपल्याला नामुस्कीला सामोरे जावा लागणार आहे. दिनांक 11 मार्च रोजी पालिकेने केलेल्या कारवाईमध्ये एका मालमत्तेला सील केले आहे.

नांदगाव नगरपरिषद तर्फे घरपट्टी / पाणीपट्टी / गाळाभाडे / जागाभाडे या कराच्या वसुलीबाबत धडक मोहीम राबविण्यात येत आहे, या मोहिमे अंतर्गत आज पर्यंत पाणीपट्टी थकबाकी चे एकूण ३० नळ कनेक्शन कट करण्यात आले आहे आणि घरपट्टी थकबाकी पैकी शहरातील सुयोग कॉलोनी परिसरातील एक रो-हाऊस सील करण्याची कार्यवाही करण्यात आली आहे. 

चालू आर्थिक वर्षात वसुलीचे उद्दिष्ट हे शंभर टक्के असून त्यासाठी पाच वेगवेगळी वसुली पथके तयार करण्यात आली आहे तरी या पथकामार्फत आतापर्यंत जवळपास 43 टक्के वसुली करण्यात आली आहे व थकबाकीदारांना अंतिम नोटीस सुद्धा वितरित करण्यात आल्या आहेत. नगर परिषदेचा कर न भरल्यास वसुली पथकामार्फत नळ कनेक्शन कट करणे, थकबाकीदारांची नावे प्रसिद्धी करणे, घरासमोर ढोल ताशांचा गजर करणे व अंतिमता मालमत्ता जप्त करणे अशा स्वरूपाशी कारवाई करण्यात येत आहे. कर न भरल्यास दरमहा दोन टक्के दराने शास्ती ही लावण्यात येत आहे.

जोपर्यंत कर वसुलीचे उद्दिष्ट साध्य होत नाही तोपर्यंत अशा प्रकारे कारवाई चालूच राहील. अशी सूचना प्रशासक तथा मुख्याधिकारी, श्री श्यामकांत जाधव यांनी दिली आहे. यांच्या मार्गदर्शनाखाली वसुली पथकामध्ये प्रशासकीय अधिकारी राहुल कुटे, कर निरीक्षक प्रमोद पवार, स्वच्छता निरीक्षक तुषार लोणारी, रामकृष्ण चोपडे, दिपक वाघमारे, सुनील पवार व इतर कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली आहे.

 कर वसुली ही शहराच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. कर न भरल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते, त्यामुळे वेळेत कर भरणे गरजेचे आहे. तसेच, ऑनलाइन प्रणालीमुळे कर भरणे अधिक सोपे झाले आहे. नांदगाव पालिकेने आज नांदगाव शहरात धडक कर्जवसुली मोहिमेमध्ये एक मोठी मालमत्ता सिल केली आहे. भविष्यात कटू प्रसंग टाळण्यासाठी नागरिकांनी वेळेत करभरून भरून पालिकेला सहकार्य करण्याचे आवाहन पालिका मुख्याधिकारी शामकांत जाधव यांनी केले आहे

Post a Comment

0 Comments