Bay- team aavaj marathi
वन व वन्यजीव संपदेचे प्रभावी संरक्षण-संवर्धनाचे काम करणारे वनाधिकारी व वन कर्मचारी यांना राज्य शासनाकडून विविध पदके जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये नाशिक विभागातील वन परिमंडलाधिकारी श्री प्रफुल्ल रामचंद्र पाटील यांना सुवर्ण पदक जाहीर झाले आहे.
शासनाच्या महसूल व वनविभागाचे कार्यासन अधिकारी श्री.वि.श.जाखोलकर यांनी मंगळवार दि.११ मार्च रोजी जाहीर केलेल्या शासन निर्णयानुसार वनसेवेतील अधिकारी कर्मचारी वन मजुर यांना उत्कृष्ट सेवेबद्दल २०२१-२२व २०२२-२३ साठी राज्यातील ८६ वनाधिकारी कर्मचारी यांना सुवर्ण रजत पदकाने गौरविण्यात येणार आहे.
त्यात नाशिक विभागातील सन 2022.23 वर्षात नांदगाव तालूक्यात कार्यरत वनविभागाचे कर्मचारी श्री प्रफुल्ल रामचंद्र पाटील यांनी नांदगाव तालुक्यातील कार्यक्षेत्रात वन्यजीव शिकार करणारे शिकारी आणि तस्करांना व वन गुन्हेगारांना जिवाची बाजी लावून जेरबंद केले व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचेवर गुन्हे दाखल करून व प्रतिबंधक कारवाया करून वन्यजीवांच्या बाबतीत घडणाऱ्या गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवले होते, या कामगिरीमुळे पाटील यांचा सन्मान करण्यात येणार आहे.
0 Comments