रानात मेंढपाळांच्या वस्तीवर भाजपा पदाधिकार्यांनी केली होळी साजरी

 Bay -team aavaj marathi 

भारतीय जनता पार्टी नासिक महानगर च्या वतीने होळी अर्थात वसंत उत्सव मुंगसारे येथील मेंढपाळांच्या पालावर (वस्तीवर) साजरा केला वसंत ऋतू च्या स्वागताला वसंत स्मृतीचे अनेक पदाधिकारी या उत्सवात सहभागी झाले होते.

 नाशिक पासून जवळच असलेल्या मुंगसारा येथे आळंदी नदीच्या काठी शहरातील पक्षाचे पदाधिकारी मेंढपाळ पशुपालकांच्या पालावर जाऊन होळी उत्सव साजरा केला. होळी उत्सव म्हणजे वाईटावर चांगल्याचा विजयाचे प्रतीक होय. फाल्गुन महिन्याचे शेवट आणि वसंतॠतु चे आगमन या निमित्ताने उपेक्षित वंचित घटकांच्या पाला तांड्यावर जाऊन होळी उत्सव साजरा करण्याचा वेगळाच आनंद मिळाला.पक्षाच्या वतीने मांडे ( पुरणपोळी) आणि दुधाचे गोड जेवण मेंढपाळांना देण्यात आले.एकंदरीत अतिशय नयनरम्य दृश्य होते, शेळ्या- मेंढ्या, कोकरांच ओरडण्याचा आवाजामुळे होळी देवतेचा सन्मान करण्यात आल्याचा भास नैसर्गिकरित्या जाणवत होता.

यावेळी भारतीय जनता पार्टी चे प्रदेश प्रवक्ते लक्ष्मणराव सावजी, शहराध्यक्ष प्रशांत जी जाधव, सरचिटणीस नाना शिलेदार, महेश जी हिरे, गणेश कांबळे, मध्य मंडलाध्यक्ष वसंत उशीर,युवा मोर्चा अध्यक्ष सागर शेलार, सचिन मोरे,जयहिंद शिंदे, प्रविण पाटील, कौत्सुभ वखारकर, ऋषिकेश फुले, परमानंद पाटील, विकास ऐखंडे, प्रविण पाटील, विनोद येवले निहीर, हजारे ऋषिकेश, सिरसाठ महेश कुलकर्णी प्रतिक कमोद ,कुलदीप, श्रीनिवास माचा, आदी सह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भटके विमुक्त आघाडी चे महानगर संयोजक सिध्देश्वर बापु शिंदे यांनी केले.तर आभार बारसु सुळ यांनी मानले.

Post a Comment

0 Comments