Bay -team aavaj marathi
भरत पारख पत्रकार नांदगाव (नाशिक)
आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या माध्यमातून नांदगाव विधानसभा मतदारसंघातील नागरिकांसाठी विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी घरपोच सुविधा दिली जाते. या माध्यमातून आज कासारी कसाब खेडा पोहे जातेगाव तसेच बोलठाण येथील ज्येष्ठ नागरिक तसेच विधवा महिला व इतर योजना पासून वंचित लाभार्थ्यांना शासनाच्या विविध योजना लाभ मिळवून देणारे मंजुरी पत्रक वितरीत करण्यात आले. याप्रसंगी लाभार्थ्यांनी घरपोच शासकीय योजनांचा लाभ मिळाल्याने आ. सुहास अण्णा कांदे यांचे आभार मानले.
मागील तीन वर्षांपासून आ सुहास अण्णा यांच्या कार्यालयातून तालुक्यातील विविध घटकांना मोफत आरोग्य सुविधा तसेच मोफत शासकीय सुविधा गावागावात घरपोच दिल्या जातात या माध्यमातून निराधार व विधवा महिलांना शासनाच्या योजनेसाठी सर्व रीतसर कागदपत्र जमा करत व शासकीय प्रक्रिया नंतर घरपोच आदेश पत्र वाटप केले जातात.
जातेगाव येथे नांदगाव तालुक्याचे लाडके आमदार सुहास आणा कांदे यांनी जातेगाव येथील गोरगरीब लाभार्थ्यांना विविध शासकीय योजना मंजूर झाल्याचे पत्र घरपोच दिल्याबद्दल ग्रामपालिकेच्या वतीने मनापासून आभार मानले.
शासकीय योजनांचे मंजूर आदेश वितरण करण्यासाठी आलेल्या आमदार कांदे यांच्या कार्यालयातील प्रकाश शिंदे व महेंद्र पगार यांचा छोटेखानी सन्मान करण्यात आला. यावेळी शिवसेना पदाधिकारी ग्रामपालिका सदस्य बाळासाहेब लाठे, राजू शेख, गुलाब चव्हाण, बाळू पांडू पवार, भरत त्रिभुवन, वाल्मीक वर्पे, रामहरी हाडपे व योजनेतील सर्व लाभार्थी हजर होते.
0 Comments