आ.सुहास अण्णा यांच्या प्रयत्नांना यश तालुक्यातील २७ प्रा.आ. केंद्रांच्या इमारतीचे होणार नुतनीकरण

 Bay- team aavaj marathi 

भरत पारख पत्रकार नांदगाव (नाशिक)

आ.सुहास आण्णा कांदे यांच्या पाठपुराव्याने नांदगाव तालुक्यातील बोलठाण आणि हिसवळ येथील असलेल्या दोन प्राथमिक आरोग्य केंद्र व तालुक्यातील पंधरा तसेच नांदगाव मतदार संघात परंतु मालेगाव तालुक्यातील दहा असे पंचवीस गावातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या नवीन इमारतीच्या बांधकामांना शासन स्तरावरून मंजुरी मिळाली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, आ.सुहास आण्णा कांदे यांच्या पाठपुराव्याने नांदगाव तालुक्यातील बोलठाण आणि हिसवळ येथील असलेल्या दोन प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या व तालुक्यातील बोलठाण, कासारी, जातेगाव, परधाडी, साकोरा, तळवाडे, पोखरी, बानगाव, कोंढार, मांडवड, वंजारवाडी, वडाळी, हिसवळ खुर्द, पिंपरखेड येथील असलेल्या १५ प्रा.आ.उपकेंद्राच्या त्याचप्रमाणे मालेगाव तालुक्यातील परंतु नांदगाव विधानसभा मतदार संघातील गिगाव, जळगाव नि., सावकार वाडी, सोनज, घोडेगाव, चिंचगव्हाण, जाटपाडे येसगाव जेऊर व दहिवाळ ह्या १० अशा २५ गावातील असलेले प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या इमारतींचे बांधकाम जिर्ण झाल्याने इमारतींचे नवीन बांधकाम करण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून शासनाकडे निर्लेखन करुन प्रस्ताव सादर करण्यात आला होता.

परंतु पाठवलेले सर्व प्रलंबित होते, त्यामुळे ना इलाजाने या निर्लेखीत इमारतींमध्ये आरोग्य केंद्र व उपकेंद्रांचे कामकाज सुरू होते. याबाबत तालुक्याचे भाग्यविधाते आ सुहास अण्णा कांदे यांना माहिती मिळताच त्यांनी शासन स्तरावर पाठपुरावा करून पंधरावा वित्त आयोगातून प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी प्रत्येकी १५७.६६ लक्ष रुपये तसेच आरोग्य उपकेंद्राच्या इमारतींसाठी प्रत्येकी ६१.१९ लक्ष रुपयांचा निधी मंजूर करुन घेतला.


मतदार संघातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देणार- आ.सुहास अण्णा कांदे 

याबाबत माहिती देताना आ सुहास अण्णा म्हणाले की, नांदगाव विधानसभा मतदारसंघांमध्ये लोक प्रतिनिधी म्हणून काम करत असताना मागील पंचवार्षिक मध्ये प्रत्येक गावच्या नागरिकांना मुलभूत सुविधा पुरविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला.अजून दिवस रात्र काम केले तरी शेतीच्या सिंचनासह अनेक लहान मोठे अनेक विकासकामे मार्गी लावणे बाकी आहे.

त्यातील एक भाग म्हणून विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या संदर्भात असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रांच्या इमारती जीर्ण झालेल्या होत्या. त्या इमारतींचे निर्लेखन करण्यात आले होते. परंतु नव्याने या सर्व २७ इमारतींच्या बांधकामासाठी शासनस्तरावर प्रस्ताव प्रलंबित होते. यासाठी वेळोवेळी संबंधित विभागाकडे पाठपुरावा केल्याने पंधरा वित्त आगोगातुन बांधकाम करण्यासाठी मंजुरी मिळाली. त्यामुळे निश्चितच नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध होतील असा विश्वास आ सुहास अण्णा कांदे यांनी व्यक्त केला.





 

Post a Comment

0 Comments