रि.पा.ई चे जिल्हाध्यक्ष अहिरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन, विविध विषयांवर होणार चर्चा

Bay -team aavaj marathi 

प्रज्ञानंद जाधव (बापू )पत्रकार, नांदगाव (नाशिक)

नांदगाव येथील शासकीय विश्राम गृह येथे दि 20 रोजी रिपाई पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री भारत सरकार ना. श्री रामदास जी आठवले साहेब यांच्या आदेशान्वये रि.पा.ई.पक्षाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष श्री. राजाभाऊ आहिरे यांच्या अध्यक्षतेखाली येथील शासकीय विश्रामगृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.अशी माहिती पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष श्री. देविदास जी मोरे यांनी प्रसिद्धीत दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरूवार दि २० मार्च रोजी नांदगाव येथील शासकीय विश्रामगृहात दुपारी एक वाजता होणाऱ्या बैठकीत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ना.श्री रामदास जी आठवले साहेब यांच्या सभेच्या कार्यक्रमाची तारीख निश्चित करणे, पक्ष संघटना बांधणी करणे, स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पुर्व तयारीस लागणे, तसेच नांदगाव शहरातील परम पूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुर्णाकृती पुतळा बसविणे, चौक सुशोभीकरण करणे तालुक्यातील पिंप्राळे या गावातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे सुशोभिकरण करणे इत्यादी बाबत तातडीचे बैठकीचे आयोजन करण्यात आले असून या व इतर विविध विषयावर बैठकीत चर्चा करण्यात येणार आहे. 

तरी तालुक्यातील सर्व कार्यकर्ते व तरूण युवकांनी उपस्थित राहण्याचे आव्हान आयोजक यांच्या तर्फे करण्यात आले आहे.अशी माहिती रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष देविदास (आण्णा) मोरे तसेच जिल्हा सचिव गंगा दादा त्रिभुवन यांच्या वतीने वृत्त माध्यमांना कळविण्यात आले आहे.



 

Post a Comment

0 Comments