वनविभागाच्या हद्दीत वन्य प्राण्यांसाठी पानवट्यांची संख्या वाढवावी- प्राणी मित्रांची मागणी

 Bay -team aavaj marathi 

मारुती जगधने जेष्ठ पत्रकार नांदगाव नाशिक 

चांदवड तालुक्यातील कातरवाडी रापली वडगाव पंगु कातरणी तळेगाव रोही व कातरणी वन विभाग परिसरातील वन्यप्राण्यांचे वास्तव्य असल्याने या परिसरात पानवट्यांची संख्या वाढवीणे गरजेचे असून असलेले पाणवठे स्वच्छ करून पाण्याची सोय करणे आवश्यक आहे.

सविस्तर वृत्त असे की चांदवड तालुक्यात वरील परिसरात वनविभागाचे परिक्षेत्र बऱ्याच मोठ्या प्रमाणावर आहे या परिसरात हरीण, काळवीट, मोर, कोल्हा तरस बिबटे ससे सायाळ इत्यादी वन्यजीव बऱ्याच संख्येने आढळतात मार्च महिना सुरू झाल्या पासून दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढल्याने जंगलातील पाण्याचे स्तोत्र कमी झाल्याने वन्य प्राण्यांना पिण्याच्या पाण्यासाठी आपला जीव धोक्यात घालून मानवी वस्तीकडे कुच करत आहेत.

 बर्याच वेळा मोकाट कुत्र्याच्या तावडीत सापडून  हरण मोर ससे इत्यादी जवळच असलेली रेल्वे लाईन ओलांडताना किंवा विहिरीत पडून आपला जीव गमवावा लागतो.

 म्हणून प्रशासनाने तसेच वन विभागाने वन्यजीवांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे किती आवश्यक आहे. याबाबत गांभीर्य लक्षात घेऊन वडगाव, रापली, कातरवाडी, तळेगाव रोही या वनविभागाच्या परिसरात त्वरित पानवठ्यांमध्ये वाढ करून त्याच प्रमाणे असलेले पाणवठे स्वच्छ करून पाण्याची सोय करावी असे मत वन्य पशु प्राणी मित्र युवा क्रांती माहिती अधिकार संघटना नाशिक जिल्हा अध्यक्ष भागवत झाल्टे यांनी दिली यांनी व्यक्त केले.



Post a Comment

0 Comments