कासलीवाल विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची रेल्वे स्टेशन व पोलीस ठाणे येथे क्षेत्रभेट

 Bay- team aavaj marathi 

विजय जी चोपडा जेष्ठ पत्रकार नांदगाव (नाशिक)

नांदगाव येथील सौ.क.मा.कासलीवाल माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी शैक्षणिक उपक्रमा- अंतर्गत येथील रेल्वे स्टेशन व पोलीस ठाणे या ठिकाणी क्षेत्रभेट दिली.भारतीय रेल्वे ही केंद्र सरकार नियंत्रित सार्वजनिक रेल्वेसेवा आहे. जगातील चौथे सर्वात मोठे रेल्वेचे जाळे आहे. या रेल्वे सेवेचे कामकाज कसे चालते मालवाहतूक, प्रवासी वाहतूक तसेच आरक्षण, रेल्वेतील सेवा, रेल्वे सिग्नल यासंबंधी विद्यार्थ्यांना माहिती व्हावी या उद्देशाने ही क्षेत्रभेट आयोजित केली होती. यावेळी स्टेशन व्यवस्थापक प्रकाश मरसाळे व सतिश यादव यांनी भारतीय रेल्वे संदर्भात महत्त्वाची माहिती विद्यार्थ्यांना दिली.

त्याचप्रमाणे नांदगाव येथील पोलीस स्टेशन या ठिकाणी देखील क्षेत्रभेट देण्यात आली.वाढती गुन्हेगारी,जमावबंदी, स्वसुरक्षा, नागरिकांची कर्तव्य तसेच विविध शस्त्रास्त्रांची माहिती पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी आणि पोलीस उपनिरीक्षक संतोष बहाळकर यांनी दिली. त्याचप्रमाणे पोलीस भरती संदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप आहेर यांनी तर मुख्याध्यापक शरद पवार यांनी आभार व्यक्त केले. 

विद्यार्थ्यांनी यावेळी रेल्वे स्टेशन व पोलीस स्टेशन परिसरात स्वच्छता अभियान देखील राबविले. संस्थेचे चेअरमन मा. सुनीलकुमार जी कासलीवाल, तसेच उपाध्यक्ष सुशील कासलीवाल, सचिव विजय चोपडा, प्रशासक प्रकाश गुप्ता, सहसचिव प्रमिला ताई कासलीवाल, विश्वस्त रिखबचंद कासलीवाल, जुगलकिशोर अग्रवाल, महेंद्र चांदिवाल, आनंद कासलीवाल, तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक सर्वश्री शरद पवार, गोरख डफाळ, विशाल सावंत व प्रिन्सिपॉल मनी चावला यांनी सर्व विद्यार्थ्यांचे व उपक्रमाचे कौतुक केले. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील सर्व शिक्षकांनी मेहनत घेतली.

Post a Comment

0 Comments