Bay- team aavaj marathi
नांदगाव तालुक्यातील कासारी वन परिमंडळातील नियतक्षेत्र ढेकू, बोलठाण व जिरी शिव हद्दीवर नरभक्षक बिबट्याने २ दिवसापासून धुमाकूळ घातला असता होता. नांदगाव आणि छत्रपती संभाजी नगर व अहिल्या नगर जिल्ह्यातील संगमनेर येथील रेस्क्यू कर्मचार्यांनी बुधवार दि.२ एप्रिल रोजी एकत्रित ऑपरेशन बिबट्या राबवून नरभक्षक बिबट्या जेरबंद करण्यात वनविभागास यश मिळाले.
नाशिक आणि छत्रपती संभाजी नगर जिल्ह्याच्या बिबट्याच्या जोडीने दहशत निर्माण केली होती. या नरभक्षक बिबट्याने वैजापूर तालुक्यातील वळन येथील ३ महिने ६ वर्ष विस दिवसांपूर्वी ३ वर्षाची मुलगी आणि एक एप्रिल रोजी जिरी येथील झुंबरबाई माणिकराव मांदडे या वयोवृद्ध महिलेला आपली शिकार केली होती.
त्यास जेरबंद करण्यासाठी नाशिक पूर्व वनविभागाचे उपवनसंरक्षक मा.श्री उमेश वावरे, सहाय्यक वनसंरक्षक श्री शिवाजी सहाणे,नांदगाव वनपरिक्षेत्र अधिकारी श्री हेमंत कोकाटे यांचे मार्गदर्शनाखाली नांदगाव आणि छत्रपती संभाजी नगर व अहिल्या नगर जिल्ह्यातील संगमनेर येथील रेस्क्यू कर्मचार्यांनी बुधवार दि.२ एप्रिल रोजी एकत्रित ऑपरेशन बिबट्या राबवून नरभक्षक बिबट्या जेरबंद करण्यात वन विभागास यश मिळाले.
तर दुसऱ्या बिबट्याने नांदगाव तालुक्यातील गोंडेगाव येथे बुधवारी सायंकाळी मानवी वस्तीवर दस्तक देवून आपल्या अस्तित्वाची जाणीव करून दिल्याने पंचक्रोशीतील नागरिक बिबट्याच्या दहशतीने भयभीत झाले आहे. त्यास जेरबंद करण्यासाठी वन विभागाकडे नागरिकांनी मागणी केली आहे.
ऑपरेशन बिबट्या राबवून यशस्वी करण्यासाठी नांदगाव चे वनपरिमंडल अधिकारी मा.श्री दीपक वडगे, श्री मगन राठोड, वनरक्षक श्री.नवनाथ बिन्नर, श्री.अमोल पवार, श्री.रविंद्र शिंदे, श्री.अमोल पाटील, श्री.विष्णु राठोड, श्री.संजय बेडवाल,वैजापूर वनविभागाचे, वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीमती.भिसे मॅडम, सहायक वनसंरक्षक, श्री प्रदीप संकपाळ, संगमनेर वनविभाग रेस्क्यू टीम चे श्री. एस.एम. पारधी,श्री.आर.आर.पडवळे,श्री.एच यु घुगे,श्री.जी. बी.पवार,श्री.अरुण यादव,श्री.अशोक शिंदे तसेच वन कर्मचारी विष्णू जाधव, दशरथ जाधव, वाल्मिक चव्हाण,मयूर हंसवाल, सोमनाथ येवले यांनी परिश्रम घेतले. या सर्व कर्मचाऱ्यांचा नागरी सत्कार करण्यात आला.
0 Comments