Bay- team aavaj marathi
मारुती जगधने जेष्ठ पत्रकार नांदगाव (नाशिक)
नांदगाव -चाळीसगाव रस्त्यावर वर असलेल्या बाबुळवाडी फाट्यावर एका पन्नास वर्ष वयाच्या अज्ञात पुरुष व्यक्तीचा गंभीर जखमी होऊन रस्त्याच्या कडेला जखमी अवस्थेत पडून असलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला असून यासंदर्भात घटनेची पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. या घटनेमधील संबंधित व्यक्तीचा घात झाला की अपघात झाला याबाबत तर्क विर्तक आवले जात आहे.
सविस्तर वृत्त असे की, दि.३० मार्च रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास नांदगाव ते जळगाव खुर्द रोडवर बाबुळवाडी फाट्यावर रस्त्याच्या कडेला नाली मध्ये एक अनोळखी पुरुष वय ४५ ते ५० जखमी अवस्थेत रस्त्याच्या कडेला पडलेला असल्याचे येथील पोलीस पाटलाने रुग्णवाहिकेत उपचारासाठी नांदगाव ग्रामीण रुग्णालयात आणले असता तेथील डॉक्टरांनी या अनोळखी तपासून मयत घोषित केले.आढळून आलेल्या या अज्ञात व्यक्तीचे अंदाजे वय ४५ ते ५० वर्ष असून उंची पाच फूट सड पातळ बांधा, कपाळावर काळया रंगाचे चट्टे आहे. रंगाने काळा सावळा असून केस काळे पांढरे दाढी पांढरी वाढवलेली आहे. अंगात निळा आकाशी व सफेद रंगाचे पट्टे असलेला बाहीचा टी-शर्ट व काळया रंगाची पॅन्ट असे वर्णन असलेला अज्ञात पुरुष मयत झालेल्या व्यक्ती बाबत कोणाला काही माहिती असल्यास नांदगाव पोलिस ठाण्यात संपर्क साधावा असे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रवीण मोरे यांनी कळविले आहे.
0 Comments