आ.सुहास अण्णा यांच्या प्रयत्नाने नांदगाव/ मनमाड बस आगारांना पहिल्या टप्प्यात मिळाल्या दहा नवीन बस

 Bay -team aavaj marathi 

भरत पारख पत्रकार नांदगाव (नाशिक)

नांदगाव आणि मनमाड बस आगारासाठी आ सुहास अण्णा कांदे यांच्या पाठपुराव्याने पहिल्या टप्प्यात प्रत्येकी पाच पाच नवीन बसेस मिळाल्याने चालक वाहकांनी केले समाधान व्यक्त.

नाशिक जिल्ह्यात ग्रामीण भागातुन सर्वाधिक उत्पन्न मिळवून देणार्या नांदगाव आणि मनमाड बस आगाराने जुनाट बस असतांना देखील आतापर्यंत वर्ष अखेर सर्वाधिक उत्पन्न मिळवून देण्यासाठी ओळखला जातो. परंतु या दोन्ही आगारात असलेल्या बस जुनाट झाल्याने अनेकदा बंद पडल्याने प्रवाश्यांना विविध अडचणींना सामोरे जावे लागले असल्याने याबाबत अनेक वेळा वर्तमानपत्रांत बातम्या आल्या होत्या.

वरील दोन्ही बस आगाराने परिवहन महामंडळाकडे वारंवार नवीन बसेस मिळाव्यात यासाठी मागणी करुन सुध्दा प्रतिसाद मिळाला नसल्याने अखेर तालुक्याचे भाग्यविधाते आ. सुहास अण्णा कांदे यांनी स्वतः पुढाकार घेऊन राज्य परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेब यांची भेट घेत नांदगाव व मनमाड बस आगारासाठी जुन्या झालेल्या बसची परिस्थिती सांगत नवीन बसेसची मागणी केली होती. आ.सुहास अण्णा यांच्या योग्य असलेल्या मागणीला परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी प्रतिसाद देत गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर नांदगाव व मनमाड या दोन्ही आगारास पहिल्या टप्प्यात प्रत्येकी ५-५ नवीन बसेस दिल्या.

आ.सुहास अण्णा यांनी स्वतः पुढाकार घेऊन दोन्ही आगारास नवीन बसेस उपलब्ध करून दिल्याबद्दल चालक वाहकांनी त्यांचे आभार व्यक्त केले. यावेळी बोलताना आ सुहास अण्णा म्हणाले की, दोन्ही आगारांना नवीन बसेस उपलब्ध करून देण्याचा मानस असून आगामी काळात आणखी बसेस उपलब्ध करून देण्यात येतील असे म्हणाले.

या आलेल्या नवीन बसेस ची आ.सुहास अण्णा यांनी फित कापून श्रीफळ वाढवून लोकार्पण केले. यावेळी त्यांनी बसेस ची स्वतः पाहणी करून समजून घेतले. व मत्री सरनाईक यांचे नवीन बसेस दिल्याबद्दल धन्यवाद व्यक्त केले. यावेळी दोन्ही बस आगाराचे आगार व्यवस्थापक,चालक, वाहक व कर्मचारी आणि शिवसेना नेते राजाभाऊ जगताप, अमोल नावंदर, प्रमोद भाबड, सागर हिरे, सुनील जाधव, प्रकाश शिंदे, ईश्वर सानप कार्यशाळा अधीक्षक, मयूर सूर्यवंशी वाहतूक निरीक्षक, विनोद अप्पर, विलास गीते, सुनील कासार, डी.पी जगधने, किरण शिनगारे, अभिजित शेरेकर,अण्णा अप्पर, अरुण सांगळे उपस्थित होते.




Post a Comment

0 Comments