Bay- team aavaj marathi
मारुती जगधने जेष्ठ पत्रकार नांदगाव (नाशिक)
नांदगाव पंचायत समितीचे वतीने शासनाच्या अध्यादेशानुसार एकात्मिक महिला व बालविकास प्रकल्प कार्यालयाने तालुक्यातील ३७ अंगणवाडी सेविका व मदतनीस या रिक्त जागेसाठी अर्ज आले होते. त्या सर्व अर्जांची छाननी करून योग्य व पात्र उमेदवारांना गुढीपाडव्याच्या साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या पवित्र मुहूर्तावर सामाजिक कार्यकर्त्या सौ.अंजूमताई कांदे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले.
आ.सुहास अण्णा कांदे व सौ अंजूमताई कांदे यांच्या दूरदृष्टी च्या नियोजनामुळे मागील दीड वर्षात तालुक्यात महिला व बालविकास विभागातील शंभराच्या वर जागा भरण्यात आल्या आहेत. त्यामुळे अनेक वर्षांपासून रिक्त असलेल्या जागेचा प्रश्न मार्गी लागला आहे.
त्यासाठी एकात्मिक महिला व बालविकास प्रकल्प विभागातील अधिकाऱ्यांनी योग्य ते अर्ज छाननी करून गुणवत्ता असलेल्या महिलांची यादी तयार करून त्यांना आमंत्रित करून त्यांना सामाजिक कार्यकर्त्या सौ. अंजूमताई कांदे यांच्या हस्ते १९ अंगणवाडी सेविका तर १८ मदतनीस या जागेसाठी आलेल्या महिला उमेदवारांना नियुक्तीपत्र दिले.
याप्रसंगी एकात्मिक महिला व बाल विकास अधिकारी श्रीम.प्राची पवार, पर्यवेक्षिका जयश्री गवळी, पुनम ताई शिंदे, संजय पारखे,शिवसेना महिला आघाडीच्या तालुकाप्रमुख विद्याताई जगताप संगीताताई बागुल, आणि रोहिणी ताई मोरे उपस्थित होते.
0 Comments