नांदगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)गटास मोठे भगदाड दिग्गज नेते व कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

 Bay- team aavaj marathi 

भरत पारख पत्रकार नांदगाव (नाशिक)

नांदगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटास मोठे भगदाड पडले असून येथील माजी मंत्री छगन भुजबळ यांचे खंदे समर्थक दिग्गज जेष्ठ नेते व येथील पंचायत समितीचे माजी सभापती डॉ.y. p. जाधव यांच्यासह गंगाधरी गावचे सरपंच उप सरपंच आणि सर्व सदस्यांचा आ. सुहास आण्णा कांदे यांच्या उपस्थितीत नांदगाव येथे देवाज बंगला या ठिकाणी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

यावेळी बोलताना आ सुहास अण्णा कांदे म्हणाले की डॉ. y.p जाधव यांच्यासारखे सुशिक्षित व ज्येष्ठ नेते माझ्या खांद्याला खांदा लावून काम करणार हे माझे भाग्य समजतो.आज माझ्यावर विश्वास ठेवून आपण शिवसेनेत प्रवेश केल्याने मला मनस्वी आनंद होत आहे. डॉक्टर साहेब आपला नेहमी आदर केला जाईल.तालुक्यातील प्रत्येक निर्णयात आपल्याला सोबत घेतले जाईल,असे मत पक्षप्रवेश वेळी आ. सुहास अण्णा कांदे यांनी व्यक्त केले. तसेच शिवसेना पक्षाच्या वतीने मी आपले स्वागत करतो यामागेही माझ्याकडून आपले मन दुखावले गेले असेल तर दिलगिरी व्यक्त करतो आणि आपल्याला पुरेपूर मान सन्मान मिळेल अशी वचन देतो असा विश्वास उपस्थित त्यांना दिला.

यावेळी डॉ. वाय.पी. जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, यापूर्वी अण्णांच्या विरोधात काम करणे ही आमचची अडचण होती परंतु आमचे संबंध नेहमी चांगलेच होते.आज गुढी पाडव्याचा शुभ मुहूर्त साधून आम्ही संपूर्ण गावाने अण्णांसोबत यापुढे कायमस्वरूपी काम करण्याचे ठरवले आणि पक्षप्रवेश केला असे मत व्यक्त केले.यावेळी डॉ. जाधव आणि मान्यवरांनी आ सुहास अण्णा यांचा सत्कार केला.

याप्रसंगी डॉ जाधव यांच्या नेतृत्वाखाली वसंतराव सोनवणे, गोविंदनाना जाधव, बाळू भाऊ भागवत, बालकृष्ण खैरे, नंदु भाऊ सोनवणे, गंगाधर जाधव, रमेश गांगुर्डे, सरपंच दुर्गा जाधव, सचिन जेजूरकर, विश्वजित जाधव, गोकुळ जेजूरकर, ताराचंद जाधव, रिकेश जाधव, दत्तू सोमासे, संजय कमोदकर, योगीराज जाधव, संदीप खैरनार, काळू जेजूरकर, किशोर सोनवणे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला.

यावेळी मनोगत व्यक्त करताना माजी सरपंच सचिन जेजूरकर यांनी यामागे आमच्याकडून काही चुका झाल्या असतील त्या पदरात घ्या आणि आपल्या विकास वाटेवर आम्हाला सामील करून घ्या आम्ही आजपासून आपले झालो असे म्हणाले. वरील मान्यवरांच्या शिवसेना पक्ष प्रवेशाच्या वेळी गंगाधरी चे शाखाप्रमुख दिगंबर भागवत, भगीरथ जेजूरकर,भरत इघे, सुनील खैरनार, सोपान जाधव इत्यादी मान्यवर उपस्थित होते.




Post a Comment

0 Comments