Bay -team aavaj marathi
नांदगाव तालुक्यातील जातेगाव पासून उत्तरेस चंदनपुरी शिवारात सह्याद्री पर्वत रांगेच्या शिखरावर असलेल्या श्री पिनाकेश्वर देवस्थानाच्या प्रांगणात निष्काम कर्मयोगी संत श्री जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांच्या तपोभूमीत सालाबादप्रमाणे यंदाही गुढीपाडव्याचे मुहूर्तावर रविवार दि. ३० मार्चपासून ते ५ एप्रिल या कालावधीमध्ये जगतगुरु श्री शांतिगिरीजी महाराजांच्या प्रेरणेने जपानुष्टान सोहळ्याचे संत महंत आणि मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजन करण्यात आले आहे.
ह्या जपानुष्टान सोहळ्याची सुरुवात निष्काम कर्मयोगी संत श्री जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांनी केली होती, यंदा जपानुष्टान सोहळ्याचे ६१ वे वर्ष आहे. या निमित्ताने शेकडो भाविकांच्या उपस्थितीत अखंड नंदादीप तेवत राहणार असून, एक कुंडात्मक यज्ञ सोहळा होणार आहे.
या आयोजित कार्यक्रमासाठी नाशिक, अहिल्या नगर, छत्रपती संभाजी नगर, जळगाव धुळे जिल्ह्यातील भाविक मोठ्या संख्येने सहभागी होणार असून आलेल्या सर्व भाविकांची व्यवस्था जय बाबाजी भक्त परिवार आणि देवस्थान ट्रस्टचे वतीने ठेवण्यात येणार असल्याचे आयोजक समितीच्या वतीने कळविण्यात आले आहे.
0 Comments