विमुक्त जाती व भटक्या जमाती कल्याण समितीच्या अध्यक्षपदी आ. कांदे यांची निवड

 Bay- team aavaj marathi 

भरत पारख पत्रकार नांदगाव (नाशिक)

विमुक्त जाती व भटक्या जमाती कल्याण समितीच्या अध्यक्षपदी नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आ.सुहास अण्णा कांदे यांची एकमताने  निवड झाली असून, या वैधानिक अध्यक्ष पदास राज्य मंत्रीपदाचा दर्जा असल्याने नांदगाव तालुक्यात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. 

सविस्तर वृत्त असे की , राज्य सरकारच्या वतीने बुधवार दि. २५ मार्च रोजी जाहीर करण्यात आलेल्या विविध ३० समित्या स्थापन करण्यात आल्या. त्यापैकी विमुक्त जाती व भटक्या जमाती कल्याण समितीच्या अध्यक्षपदी आ. सुहास अण्णा कांदे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. या वैधानिक अध्यक्ष पदास राज्य मंत्रीपदाचा दर्जा असल्याने नांदगाव तालुक्यात आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

या समितीमध्ये इतर दहा सदस्य असून राज्य सरकारच्या वतीने आ सुहास अण्णा कांदे यांची विमुक्त जाती व भटक्या जमाती कल्याण समिती- च्या अध्यक्षपदी निवड करण्यात आल्याबद्दल आ. सुहास अण्णा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख व उपमुख्यमंत्री,एकनाथराव शिंदे व अजितदादा पवार यांचे प्रत्यक्ष भेट घेऊन आभार मानले. याप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस साहेब व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आ सुहास अण्णा यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना आ सुहास अण्णा म्हणाले की, या समिती अंतर्गत येणाऱ्या सर्व विषयांना योग्य तो न्याय दिला जाईल असे आश्वासीत केले.

Post a Comment

0 Comments