राजर्षी छत्रपती शाहू महाराज सोशल ग्रुप तर्फे मुस्लिम बांधवांसाठी दि २८ रोजी इफ्तार पार्टीचे आयोजन ...

Bay -team aavaj marathi 

प्रज्ञानंद बापू जाधव पत्रकार नांदगाव (नाशिक)

नांदगाव येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज सोशल ग्रुपच्या वतीने दिनांक २८ रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक येथे रोजा उपवासाच्या निमित्ताने मुस्लिम बांधवांसाठी सायंकाळी ६ वाजे नंतर दावत ए इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे. 

सविस्तर माहिती अशी की नांदगाव शहरातील सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या नांदगाव येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी सोशल ग्रुप ने "सर्व धर्म समभाव" तसेच भारताच्या पवित्र ग्रंथ प्रस्थावनेचा व राज्य घटनेच्या विचारांवर कायमच शांत प्रिय मार्गांवर राहून आपला सामाजिक कार्यातून ठसा उमटवला आहे.! 

प्रत्येक जाती धर्माचा सोहळा सातत्याने साजरे करणारा हा सोशल ग्रुप कायमच जनतेच्या चर्चेत असतो.आता सध्या मुस्लीम बांधवांचे २ मार्च पासुन उपवास रोजा सुरु झाले आहे रमजान महिना हा मुस्लिम बांधवांसाठी अतिशय पवित्र मानला जातो. लहान मुलांपासून ते वयोवृद्ध व्यक्ती अतिशय कडक उपवास अन्न पाण्याचा त्याग करून ठेवला जातो.!

स्वातंत्रता,समता,बंधुता,न्याय ठेऊन सातत्याने छत्रपती शाहू महाराज ग्रुप आपल कार्य निःस्वार्थपणे मेहेनत करून करत असतो दावत ए इफ्तार पार्टी दर वर्षी या ग्रुप तर्फे आयोजन करण्यात येते तरी येत्या दि २८ रोजी रोजा या उपवासाच्या २७ व्या दिवशी शुक्रवार रोजी सायंकाळी डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक येथे या इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे. 

हिंदू-मुस्लिम बौद्ध व इतर समाज बांधवांनी मुस्लिम बांधवानी या दावत ए इफ्तार पार्टीसाठी या इफ्तार पार्टीचा अस्वाद घ्यावा अशी विनंती संस्थापक अध्यक्ष महावीर (नाना) जाधव अध्यक्ष प्रशांत गरुड,गौतम काकळीज, जफ्फर शेख,सोहेल रंगरेज, ऋषीं जाधव, दीपक मोरे,सोमनाथ चौधरी, किरण पवार, प्रमोद पगारे, पिंटू लोखंडे, पिंटू इघे, समाधान इघे, सलमान बेग, सलमान शेख, प्रज्ञानंद जाधव अदींनी केले आहे.



Post a Comment

0 Comments