Bay -team aavaj marathi
भरत पारख पत्रकार, नांदगाव (नाशिक)
गायक कुणाल कामरा विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणीचे निवेदन नांदगाव पोलीस ठाण्यात शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने देण्यात आले.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, शिवसेनेचे प्रमुखनेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या वर बदनामी कारक गाणे तयार करून गायले त्या गायक कुणाल कामरा याच्यावर नांदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीचे निवेदन शिवसेनेच्या वतीने घोषणा देत देण्यात दिले.
नांदगाव शहर शिवसेनेच्या वतीने आज नांदगाव पोलीस स्टेशन येथे निवेदन देण्यात आले, कामरा यास लवकरात लवकर अटक करण्यात यावी. तसेच त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणी सह यावेळी एकनाथ शिंदे साहेबांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली.
याप्रसंगी शिवसेना शहरप्रमुख सुनील जाधव सागर हिरे प्रकाश शिंदे, शिवाजी पाटील, रमेश काकळीज, भैय्या पगार, संतोष शर्मा, सुरज पाटील, संजय देवरे, दिनेश ओचानी, बापू सोनवणे, रवी सोनवणे, गणेश सांगळे, अक्षय पवार आदीसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments