कुसूमतेल येथील प्राथमिक शाळेत वार्षिक स्नेह संमेलनाचा कार्यक्रम उत्साहात साजरा

 Bay-team aavaj marathi 

 नांदगाव तालुक्यातील घाटमाथ्यावर सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाने नटलेल्या कुसूमतेल या छोट्याश्या गावातील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांच्या विविध कला गुणांना विकसित व प्रोत्साहीत करण्यासाठी सालाबादप्रमाणे यंदाही स्नेहसंमेलनाचे आयोजन शनिवार दि २२ रोजी सायंकाळी सहा वाजता करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आ. सुहास अण्णा कांदे यांचे समर्थक प्रकाश शिंदे,युवा सेना तालुकाप्रमुख गुलाब चव्हाण, तालुका बाजार समितीचे उप सभापती अनिल सोनवणे, गोकुळ कोठारी,प्रहार शेतकरी संघटना अध्यक्ष संदीप सूर्यवंशी हे होते.

यावेळी छ.शिवाजी महाराज,महात्मा जोतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, वीर एकलव्य, बिरसा मुंडा, संत सेवालाल महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांचे विद्यार्थ्यांमधून प्रतिकात्मक रूप तयार करून गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली होती. 

या कार्यक्रमाची सुरवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विद्येची देवता देवी सरस्वती, भारत माता यांच्या प्रतीमेचे व रंगमंचाचे पूजन करून करण्यात आली या प्रसंगी फटाक्यांची प्रचंड आतिषबाजी करण्यात आली.या कार्यक्रमासाठी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. संजय जगताप यांनी वाद्य संगीताचा संच उपलब्ध करून दिला. मुख्याध्यापक श्री.सुनिल अहिरे, शिक्षक श्री.संदेश कुमार मेश्राम, शिक्षीका श्रीमती वैष्णवी खैरनार यांच्यासह सर्व शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी उपाध्यक्ष संजय गावंडे व सदस्य, गावचे सरपंच श्री.संदीप पाटील, उपसरपंच काळू भूतांबरे व ग्रा.पं.सदस्य तसेच येथील माजी सरपंच रामदास गावंडे, पोलीस पाटील अशोक पाटील, शरद जगताप, कैलास कोळपे, अप्पासाहेब जगताप रवींद्र चव्हाण विकास जगताप यांचे सहकार्याने कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.यावेळी कार्यक्रमासाठी गावातून मोठ्या संख्येने पालक वर्ग व ग्रामस्थ उपस्थित होते. 




Post a Comment

0 Comments