Bay -team aavaj marathi
मारुती जगधने जेष्ठ पत्रकार नांदगाव (नाशिक)
पिण्याच्या पाण्याच्या शोधात नांदगाव-मनमाड रस्त्यावर हरणाचा अपघाती मृत्यू झाला आहे, विशेषतः उन्हाळ्यात वन विभागात नैसर्गिक अधिवासात चारा व पिण्याच्या पाण्यासाठी काळवीट, कोल्हे, ससे, लांडगा इत्यादी वन्यप्राणी भटकंती करत असताना रस्ता ओलांडताना मोठ्या प्रमाणात अपघातात मृत्यूमुखी पडल्याच्या घटना घडत असतात.
दरम्यान नांदगाव मनमाड रोड वरती तिसऱ्या किलोमीटरवर दिनांक २२ मार्च रोजी भरधाव वेगाने वाहणाऱ्या अज्ञात वाहनाने सकाळी साडेसात वाजता हरणाला जबर धडक मारल्याने सुमारे ५० फूट लांब जाऊन पडल्याने हरणाचा जागीच मृत्यू झाला आहे. स्थानिक काही नागरिकांनी या अज्ञात वाहनाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.परंतु ते भरधाव वेगाने निघून गेले. घडलेल्या घटने बाबत नागरिकांनी वन विभागाला प्रत्यक्ष जाऊन घटनेची खबर दिली असता हरणाचा वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी रितसर पंचनामा करून त्याचा दहन विधी केला.
दरम्यान अपघाती मृत्यू झालेल्या हरणावर भटके कुत्रे ताव मारण्याच्या तयारीत असताना प्राणी मित्र वसंत वडगे शशिकांत पाटील, सुनील राऊत या नागरिकांनी घटनास्थळी थांबून कुत्र्यांपासून रक्षण केले. यावेळी वरील अपघाताची माहिती प्रत्यक्ष देवून सुध्दा वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी उशीर पोहोचल्याने नागरिकांनी खेद व्यक्त केला.
नांदगाव मनमाड रस्त्यावर पाच किलोमीटर अंतरात श्रीराम नगर फुलेनगर हिसवळ हद्दीमध्ये वन विभागाचे जंगल असल्याने पिण्याच्या पाण्याच्या शोधात नागरी वस्तीकडे हरणांचा येण्याचे प्रमाण अधिक असल्याने एक तर अपघातात किंवा भटक्या कुत्र्यांची शिकार होवून त्याना जिव गमवावे लागत आहे.
वन विभागाने वन्यजीवांसाठी पिण्याच्या पाण्याची आणि चार्याची व्यवस्था केल्यास अपघाताचे प्रमाण कमी होईल.या कार्यक्षेत्रात बिबट्या, हरीण, मोर, लांडगे, तरस, कोल्हे, ससे, तितर ,लावरी आदी वन्य प्राण्यांचे वास्तव्य आहे. दरम्यान श्रीराम नगर फुलेनगर हिंगणवाडी, साकोरा या कार्यक्षेत्रामध्ये हरणांचे प्रमाण प्रचंड प्रमाणात असून हरणांपासून पिकांची देखील मोठे नुकसान होत असल्याच्या तक्रारी शेतकरी करतात यावर देखील वनविभागाने योग्य ते उपाययोजना करावेत अशी मागणी होत
0 Comments