नांदगावच्या पाच वर्षीय रोहान याने केला ठेवला रोजा चा उपवास...

 Bay -team aavaj marathi 

प्रज्ञानंद (बापू) जाधव पत्रकार नांदगाव (नाशिक)

नांदगाव शहरातील प्रसिद्ध मोईन ॲटो इलेट्रीक/ बॅटरी वाले  शेख हाजी फैसल यांचा पाच वर्षाचा चि. शेख रोहान हाजी फैसल कोर्ट गल्ली नांदगाव या चिमुकल्याने रमजान महिन्यातील सुरु असलेले पवित्र रोजाचा उपवास ठेवत तब्बल १४ तास निर्जल व्रत केल्याने त्याचे सर्वत्र कौतुक होतं आहे.

सविस्तर माहिती अशी की, मुस्लिम समजातील पवित्र समजल्या जाणाऱ्या रमजान महिन्यास दोन मार्च पासुन सुरुवात झाली असुन रमजान महिना हा मुस्लिम समाजातील पवित्र महिना मानला जातो या महिन्यात बहुतांश मुस्लिम बांधव / महिला निर्जल उपास ठेऊन अल्लाची इबादत करतात. त्याप्रमाणे शेख हाजी फैसल यांच्या घरी देखील बहुतेक सदस्यांनी उपवास केला आहे.

आपल्या घरातील वडिलधारे रोज अन्न पाणी त्याग करून उपवास करत असल्याने चि. रोहान याच्या मनात देखील इच्छा प्रसन्न झाली. ज्या वयात कसलीही समज नसतांना ही देखील या लहानग्या रोहानने हट्ट धरतं आपल्या धर्माच्या रितीरिवाजाने घरातील संस्काराणे प्रेरित होऊन तेरा ते चौदा तासभर अन्न पाणी न घेता रोजा ठेवण्याचे धाडस केल्याने घरातील वातावरण आनंदमय होऊन गेले होते. 

या रोजा उपवासासाठी पाच वेळेची नमाज आणि यात पुन्हा एक तराबीची नमाज असते ती एक तास भर चालते त्यात मुस्लिम समाजातील पवित्र ग्रंथ कुराण ही वाचले जाते.असे अनेक मुस्लिम समाजातील रितिरिवाजाने रोहान याने रोजा पकडला वडील शेख हाजी फैसल यांचे काही हिंदू बांधवानी मुलांना आपल्या धर्मा बद्दल चांगले संस्कार व त्याचा हट्ट पुर्ण केल्याने देखील कौतुक केले जात आहे या पाच वर्षीय शेख रोहान हाजी फैसल याचं सर्वत्र कौतुक होतं असुन शेख कुटुंब अतिशय आनंदी झाले आहेत. आमच्या ५ वर्षीय रोहानने अतिशय व्यवस्तीतपणे अगदी कडक उन्हाळ्यात अन्न पाणी त्याग करून रोजा ठेवल्याने आणि तो पुर्ण केल्याने आम्ही धन्य झालो असे त्यांचे चेहऱ्यावरील भाव दिसुन येतं होते. 


लहानशा रोहान सर्व धर्मांतील नागरिकांनी आपापल्या प्रथेप्रमाणे लहान वयात मुलांना द्यायला हवी असे मत या निमित्ताने जातेगाव येथील अयुब शेख, गुलाब पठाण बाबुभाई शेख यांनी व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments