उमरखेड नगर परिषदेकडून सन २०२५/२६ या आर्थिक वर्षासाठी विविध विभागांत मनुष्यबळ पुरवठ्यासाठी काढण्यात आलेल्या ई-निविदा प्रक्रियेत गंभीर अनियमितता आढळून आल्याचा आरोप माजी नगरसेवक आणि सामाजिक कार्यकर्ते शेख रसूल पटेल यांनी केला आहे. तसे त्यांनी जिल्हाधिकारी आणि मुख्याधिकारी यांना या बाबत निवेदन देत निविदा रद्द करून फेर निविदा प्रक्रिया राबवण्याची मागणी करत संपूर्ण कार्य पद्धतीवर प्रश्नचिन्ह? उपस्थित केले आहे.
नगर परिषदेकडून बोलाविलेल्या निविदा बेकायदेशीर असल्याची तक्रार शेख रसूल पटेल यांनी तक्रार दाखल केली होती. मात्र, त्यावर कोणतीही कारवाई न झाल्याने त्यांनी पुन्हा जिल्हाधिकारी व मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे लक्ष वेधले असून यामध्ये त्यांनी सदर निविदा प्रक्रिया रद्द करून नव्याने व पारदर्शक पद्धतीने निविदा प्रक्रिया राबविण्याची मागणी केली आहे .त्यांच्या म्हणण्या- नुसार नगर विकास विभागाच्या स्थायी निर्देश क्रमांक ३६ च्या परिच्छेद १४ नुसार, मनुष्यबळ पुरवठ्यासाठी थेट कंत्राट देणे प्रतिबंधित आहे. तरीही, उमरखेड नगर परिषदेकडून या निर्देशांचे सर्रास उल्लंघन करून निविदा प्रक्रिया राबवली जात आहे .
तरी निविदा तत्काळ रद्द करावी व सर्व कामाच्या फेर निविदा आऊट पुट बेस वर बोलविण्यात याव्या अशी मागणी त्यांनी केली असून तसे न झाल्यास, न्यायालयीन कारवाईचा मार्ग अवलंब करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. या प्रकारामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. जिल्हाधिकारी या सर्व प्रकरणावर कोणती कार्यवाही करणार यावर शहरासह संपूर्ण तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
0 Comments