Bay -team aavaj marathi
सिताराम पिंगळे पत्रकार नांदगाव (नाशिक)
दरवर्षी २१ जून हा दिवस जागतिक योगदिन म्हणून साजरा केला जातो या निमित्ताने मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे होरायझन अकॅडमी नांदगाव शाळेत जागतिक योगदिन उत्साहात साजरा करण्यात आला.
या वेळी विद्यार्थ्यांनी प्राणायाम व योगासनाचे प्रात्यक्षिके सादर केले.त्यात कपालभाती,अनुलोम, भ्रामरी, आदी प्राणायाम आणि सूर्यनमस्कार, वृक्षासन, ताडासन, वज्रासन, पद्मासन, शवासन, अर्धचक्रासान, त्रिकोनासान, शाशंकासान, भुजंगासन, आदी आसने केली त्यांना मार्गदर्शन शाळेचे क्रीडा शिक्षक पृथ्वीराज वडघुले यांनी केले.
शालेय प्राचार्या श्रीमती.पुनम मढे यांनी कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.व शालेय शिक्षिका श्रीमती.शरयू आहेर यांनी विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनात योगासनाचे महत्व सांगितले व प्रतिज्ञा दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वप्ना जाधव यांनी केले. या कार्यक्रमासाठी शाळेचे सर्व शिक्षक,शिक्षिका शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
0 Comments