नांदगाव तालुक्यातील तीस गावांचा पोक्रा योजनेत समावेश मांडवड येथे योजनेबद्दल शेतकऱ्यांना मार्गदर्शन

 Bay- team aavaj marathi 

सिताराम पिंगळे पत्रकार मांडवड, नांदगाव (नाशिक)

नांदगाव तालुक्यातील मांडवड येथे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा दोन पोक्रा योजने बाबत मांडवड येथील शेतकऱ्यांना नांदगाव तालुका कृषी विभागाच्या वतीने मार्गदर्शन करण्यात आले.

या कार्यक्रमानिमित्त नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा दोन योजनेची सखोल माहिती यावेळी शेतकऱ्यांना देण्यात आली त्यात तालुक्यातील तब्बल 30 गावांचा समावेश आहे. या गावातील शेतकऱ्यांना वैयक्तिक लाभ तसेच सामुदायिक लाभ आदी बद्दल कृषी अधिकारी यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. 

त्यात संरक्षित सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता, उत्पादन प्रक्रिया कार्यक्षमतेला प्रोत्साहन देणे हवामान अनुकूल तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देणे. संरक्षित शेती पद्धती,जमिनीमध्ये  कर्ब ग्रहणाचे प्रमाण वाढवणे, एकात्मिक शेती पद्धती, पाणी साठवण संरचनांची निर्मिती आदी घटकांबद्दल माहिती सांगितली.

या योजनेचा सर्व शेतकरी बांधवांनी लाभ घ्यावा असे आव्हान देखील करण्यात आले. या निमित्ताने मांडवड गावातून मशाल फेरीचे आयोजन देखील करण्यात आले होते या मशाल फेरीत पाणी आडवा पाणी जिरवा, जय जवान जय किसान, गटात शेती थाटात शेती अशा घोषणा देण्यात आल्या.

या कार्यक्रमासाठी नांदगाव तालुका मंडल कृषी अधिकारी राठोड, कृषी अधिकारी प्रशांत देशमुख कृषी विभागातील सागर पवार, रोशन लिलके, गौरव क्षीरसागर, तेजस्विनी देवकाते, प्रियंका पोटकुले,  प्रशांत अहिरे आदी कृषी विभागातील कर्मचाऱ्यांसह मांडवड चे सरपंच अंकुश डोळे, विठ्ठल आहेर, अशोक निकम,सागर आहेर, नरहरी थेटे, संजय निकम, पांडुरंग आहेर,सुशील आंबेकर,गंगाधर थेटे, प्रकाश थेटे,चांगदेव आहेर, अमोल खोमणे,दत्तात्रय निकम खंडू थेटे, आधी ग्रामस्थांसह गावकरी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments