जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती...

 Bay- team aavaj marathi 

सिताराम पिंगळे पत्रकार मांडवड, नांदगाव (नाशिक)

आज दि.२६ जून रोजी जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त न्यू इंग्लिश स्कूल नांदगाव या विद्यालयात नांदगाव पोलीस निरीक्षक श्री भदाने साहेब यांनी विद्यार्थ्यांना अमली पदार्थांपासून होणारे दुष्परिणाम व अमली पदार्थांच्या आहारी न जाण्याचे आव्हान केले. 

Just try चे रूपांतर व्यसनामध्ये देखील होऊ शकते म्हणून या पदार्थांपासून लांब राहण्याचे आव्हान माननीय श्री भदाणे साहेबांनी केले. याप्रसंगी व्यासपीठावर विद्यालयाचा मुख्याध्यापिका श्रीमती काळे मॅडम व पर्यवेक्षक श्री शेवाळे सर उपस्थित होते. यानंतर जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त प्रतीक म्हणून मा.श्री भदाने साहेबांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी विद्यालयातील हरित सेनेचे सहकार्य लाभले.

Post a Comment

0 Comments