मानव विकास योजनेअंतर्गत बस सेवा करण्याकरिता महामंडळास निवेदन

 Bay- team aavaj marathi 

मारुती जगधने जेष्ठ पत्रकार नांदगाव (नाशिक)

मानव विकास मिशन अंतर्गत ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांना नांदगाव येथे मविप्र संचलित न्यू इंग्लिश स्कूल तसेच महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी हित लक्षात घेऊन दररोज विद्यार्थ्यांना शाळेत येण्या जाण्या साठी बस सेवा सुरू करण्यात यावी याकरिता नांदगाव बस स्थानकाचे वाहन निरीक्षक विनोद इप्पर  यांना संस्थेचे तालुका संचालक श्री.अमित भाऊ बोरसे पाटील यांनी निवेदन दिले. समवेत ज्येष्ठ नेते श्री .रमेश आण्णा बोरसे, शालेय समिती अध्यक्ष श्री. विजय काकळीज सर, डॉ. प्रवीण निकम, श्री. राजेंद्र पाटील हे उपस्थित होते.

यावेळी शालेय शिक्षणासाठी ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांना नांदगाव आगारातून शालेय वेळापत्रक प्रमाणे बसेस उपलब्ध करून दिल्या जातील असे आश्वासन नियंत्रक विनोद इप्पर यांनी श्री अमित भाऊ बोरसे पाटील यांना दिले.

Post a Comment

0 Comments