Bay -team aavaj marathi
शिवचरण हिंगमिरे पत्रकार उमरखेड (यवतमाळ)
उमरखेड शहरासह राज्यातील अनेक शहरांतील बायपास, खरब मैदान, शासकीय हायस्कूल, रेल्वे स्टेशन, बसस्थानक, महाविद्यालय परिसर अशा विविध ठिकाणी चरस, गांजा व नायट्रोजन गोळ्यांची खुलेआम विक्री होत असल्याने तरुणाई नशेच्या गर्तेत अडकत असुन गॅगवार व खुनाच्या घटना घटत असल्याचे चित्र समोर येत आहे. तसेच, ऑनलाईन गेम्सच्या वाढत्या व्यसनामुळे तरुणांचे मानसिक स्वास्थ्य ढासळत आहे. याकरिता सामाजिक संघटन युथ मुव्हमेन्ट ऑफ महाराष्ट्र च्या कार्यकर्त्यांनी उपविभागीय अधिकारी उमरखेड यांना निवेदन देऊन अंमली पदार्थांवर कठोर कारवाई व ऑनलाईन गेम्स वर सरसकट बंदीची मागणी केली आहे.
निवेदनात त्यांच्या मते शहरात काही ठिकाणी रात्रीच्या वेळेस तरुणांच्या जमावात खुलेआम नशा केली जाते. यामुळे केवळ कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला नसून अनेक कुटुंबांचे संसार उध्वस्त होण्याच्या मार्गावर असून भविष्यात धोक्याची घंटा आहे. तसेच यापूर्वी पोलिस प्रशासनाला तक्रारी देऊनही कारवाई न झाल्याची खंतही त्यांनी व्यक्त केला आहे.
चरस, गांजा व नायट्रोजन गोळ्यांच्या विक्रेत्यांच्या विरुद्ध विशेष मोहिम राबवावी, व्यसनाधीन तरुणांसाठी पुनर्वसन योजना कराव्या ,संवेदनशील भागात गस्त वाढवून जमावावर नियंत्रण घालावे ,ऑनलाईन गेम्स वर सरसकट बंदी आणि याबाबत शासन पातळीवर ठोस धोरण आखावे,शाळा-महाविद्यालयांमध्ये जनजागृती मोहीम सुरू करावी अश्या मागणीचे निवेदन उपविभागीय अधिकारी उमरखेड यांना देण्यात आले.
यावेळी सोहल खान, साबीर नाईक, शाहीद खान, फेजान लाला, उमेर खान, अजीम अली, साकीब शेख, माजीद खान, जिदान शेख, अयान खान, सिबगत उल्ला, आदी युवक उपस्थित होते.
0 Comments