Bay- team aavaj marathi
सिताराम पिंगळे पत्रकार मांडवड नांदगाव (नाशिक)
नांदगाव येथील मराठा विद्या प्रसारक समाजाचे होरायझन अकॅडमी शाळेत गुरुपौर्णिमा निमित्त विविध कार्यक्रमांनी उत्साहात संपन्न झाली.या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शाळेच्या प्राचार्या पुनम डी.मढे यांनी भूषविले. तसेच व्यासपीठावर शरयू आहेर व सोनाली खैरनार उपस्थिती होत्या.
कार्यक्रमाच्या सुरवातीला माता सरस्वती आणि आद्य गुरु व्यासमुनी यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले. यानंतर पूर्व प्राथमिकच्या विद्यार्थ्यांनी गुरु शिष्यांची वेशभूषा सादर केली होती. त्यांना मार्गदर्शन श्रीम.सोनाली खैरनार व प्रणाली गायकवाड यांनी केले.
गुरू पौर्णिमा विषयी माहिती शालेय शिक्षक सिताराम पिंगळे यांनी भाषणातून सांगितले. विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात तसेच दैनंदिन व्यवहारात गुरूंचे मार्गदर्शन घ्यावे. आपल्या जीवनात गुरूचे योगदान सर्वात मोठे आहे. असे कार्यक्रमाच्या अध्यक्ष तथा शालेय प्राचार्या श्रीम. पुनम डी.मढे यांनी सांगितले. यानंतर इयत्ता पहिली ते सहावीच्या विद्यार्थ्यासाठी हिंदी भाषेत वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते त्यात विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर भाषणे केले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन वर्ग शिक्षकांनी केले.
या कार्यक्रमासाठी मराठा विद्या प्रसारक समाजाचे नांदगाव तालुका संचालक इंजि. अमित भाऊ बोरसे-पाटील यांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शालेय शिक्षिका रोहिणी वाघ यांनी केले. तसेच शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.
0 Comments