पोलिस विभागाची धडक कारवाई गांजा तस्करी करणाऱा मुद्देमालासह ताब्यात

 Bay -team aavaj marathi 

Dr. शिवचरण हिंगमिरे पत्रकार उमरखेड (यवतमाळ)

यवतमाळ जिल्ह्यात अवैद्य व्यवसायाच्या विरोधात पोलीस अधीक्षकांच्या निर्देशानुसार कारवाईचा मोठा धडाका सुरू असून बुधवार दि.९ रोजी गांजाची तस्करी करणाऱा मुद्देमालासह ताब्यात घेतले.

याबाबत सविस्तर वृत्त असे की,उमरखेड पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहिती नुसार उमरखेड- महागाव महामार्गावर असलेल्या राजस्थान धाब्याजवळ अंगात काळया रंगाचा शर्ट व काळ्या रंगाचा पॅन्ट घातलेला एक व्यक्ती गांज्याची विक्री करण्याच्या उद्देशाने अवैध रित्या गांजा घेउन येत आहे. 

 खबर मिळाली पो.उप नि योगेश जाधव असतां त्यांनी 
यवतमाळ पोलीस अधिक्षक कुमार चिंता,अप्पर अधिक्षक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड, पो. नि. शंकर पांचाळ यांचे मार्गदर्शन घेऊन यांच्या मार्गदर्शनानुसार तत्काळ क्षणाचाही विलंब न करता स्वतः ठाणेदार शंकर पांचाळ, पो.उप.नि योगेश जाधव, पो.उप नि. सागर इंगळे, पो कॉ.नोळे, महाळनर, दरबस्तेवार, रुद्र सरकारी पंच यांच्या सह राजस्थान धाब्याजवळ सापळा रचून आरोपी  गजानन अशोक डहाळे, वय-अंदाजे २५ वर्ष, रा. गोचरस्वामो वार्ड, सोनार लाईन, उमरखेड याला ताब्यात घेतले.

त्याच्या जवळ नायलॉनच्या एका पांढऱ्या रंगाच्या गोणी मध्ये हिरवट काळपट गांजा आढळून आला ज्याचे निव्वळ वजन २३१३ ग्रॅम अंदाजे किंमत वीस हजार रुपये प्रति किलो प्रमाणे  एकुण ४६०००/- रुपये किंमतीचा गांजा अंमली पदार्थ आढळून आला, त्यावरून आरोपीस ताब्यात घेवुन त्याचे वर पो स्टे उमरखेड येथे गुन्हा नोंद करण्यात आला.

 सदर कारवाई यवतमाळ पोलीस अधिक्षक कुमार चिंता,अप्पर अधिक्षक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड, पो. नि. शंकर पांचाळ यांचे मार्गदर्शनाखाली पो.उप नि.योगेश जाधव,डी बी प्रमुख पो. उप नि. पो.उप नि. सागर इंगळे, संदिप ठाकुर, दिनेश चव्हाण,  नोळे,  महाळनर, दरवस्तेवार, रुद्र यांनी यशस्वीरित्या पार पाडली.

Post a Comment

0 Comments