रोटरी क्लबचे माध्यमातून सामाजिक कार्यासाठी योग्य व्यासपीठ - महेश मोकळकर

 Bay-team aavaj marathi 

Dr. शिवचरण हिंगमिरे पत्रकार उमरखेड (यवतमाळ)

सामाजिक जीवन जगत असताना आपण कोणाच्यातरी गोर गरिबांच्या उपयोगी पडलो पाहिजे त्यासाठी रोटरी क्लब च्या माध्यमातून चांगले काम करता येवू शकते. म्हणून आपण आपले योगदान रोटरी क्लबच्या माध्यमातून काम करा असे प्रतिपादन रोटरी क्लब चे पी.डी.जी महेश मोकळकर यांनी उमरखेड येथे रोटरी क्लबच्या पदग्रहण सोहळा कार्यक्रमाचे वेळी केले.

 ते उमरखेड तालुका रोटरी क्लबच्या पदग्रहण समारंभात स्पोर्ट कॉम्प्लेक्स च्या सभागृहात प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. यावेळी मंचावर उपप्रांतपाल रोटे.कैलास उदावंत, मावळते अध्यक्ष रोटेरियन दत्ता गंगासागर, मावळते सचिव चेतन माहेश्वरी नवनिर्वाचित अध्यक्ष रोटे. श्रीराम सारडा नवनियुक्त सचिव रोटे.डॉ.विशाल माने उपस्थित होते. 

पुढे बोलताना ते म्हणाले की, माझ्या ३२ वर्षाच्या रोटेरी क्लब च्या सदस्य कालावधीमध्ये मला रोटरी क्लब साठी खूप काही काम करता येण्याचे भाग्य प्राप्त झाले. त्यामुळे मला सामान्य माणसासाठी विविध प्रोजेक्ट रोटरी क्लबच्या माध्यमातून राबवून सेवा देण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न केले. आणि आज वर्धा जिल्ह्यात रोटरी क्लबच्या माध्यमातून शंभरच्या वर प्रोजेक्ट यशस्वीपणे सुरू असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. 

रोटरी क्लब उमरखेड चा पदग्रहण समारंभ वेळी मावळते अध्यक्ष दत्ता गंगासागर यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष श्रीराम सारडा व मावळते सचिव चेतन माहेश्वरी यांनी नवनिर्वाचित सचिव डॉ.विशाल माने यांना पिन देऊन प्रभार दिला. 

यावेळी मावळते अध्यक्ष दत्ता गंगासागर यांनी मागील वर्षात केलेल्या विविध सामाजिक कामाचा आढावा दिला तर नवनिर्वाचित अध्यक्ष श्रीराम सारडा यांनी आगामी काळात होणाऱ्या नवीन राबविण्यात येणाऱ्या प्रोजेक्ट बद्दल संकल्पना मांडली व नवचैतन्यांनी सर्वांना सोबत घेऊन काम करणार असा विश्वास दिला. नव- निर्वाचित सचिव डॉ.विशाल माने यांनी २०२५ /२६ ची कार्यकारणी घोषित केली.

 तर आगामी काळात ५० च्या वर प्रोजेक्ट करून रोटरीचे कार्य ग्रामीण भागामध्ये पोहोचण्याचे काम करणार असे त्यांनी सांगितले. याच दिवशी दहावीच्या विद्यार्थ्यांकरिता अभ्यासक्रम सहजरीत्या आकलन होण्याकरिता आकांक्षा ॲपचे उद्घाटन करून १००० ॲप विद्यार्थ्यांना देण्यात येणार असल्याचे सांगितले व याच दिवशी उमरखेड शहरातील व तालुक्यातील जनतेसाठी कायरोथेरपी ट्रीटमेंट या प्रोजेक्टचे उद्घाटन करून यामध्ये ३०० रुग्णांना लाभ होणार असल्याचे सचिव डॉ.विशाल माने यांनी सांगितले. यावेळी रोटरीचे सदस्य सेवानिवृत्त शिक्षक सुरेश कदम यांचा सह पत्नी सत्कार करण्यात आला व सेवानिवृत्त मंडळ अधिकारी दत्तात्रय दुर्केवार यांची सेवानिवृत्त महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाला रोटरीचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.अनिल काळबांडे यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार सुदर्शन नरवाडे यांनी मानले.

Post a Comment

0 Comments