कासलीवाल विद्यालयाच्या गौरव ची महाराष्ट्र सब ज्युनिअर शुटिंग बॉल संघात निवड

 Bay- team aavaj marathi 

विजय जी चोपडा जेष्ठ पत्रकार नांदगाव {नाशिक}

महाराष्ट्र राज्य शुटिंग बॉल असोसिएशन व अहिल्या नगर शुटिंग बॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने 44 वी महाराष्ट्र राज्य सब ज्युनियर शूटिंग बॉल स्पर्धा डी पॉल इंग्लिश मिडीयम स्कूल राहुरी फॅक्टरी येथे संपन्न झाल्या. यामध्ये मुलांचे 13 तर मुलींचे 8 संघ सहभागी झाले होते.या स्पर्धेत नाशिक जिल्ह्यातील संघ देखील सहभागी झाले होते.

नाशिक जिल्ह्यातील या संघात नांदगाव येथील सौ.क.मा. कासलीवाल माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी गौरव राऊत याने चमकदार कामगिरी केली.या कामगिरीच्या आधारे महाराष्ट्र राज्य शुटिंग बॉल संघामध्ये त्याची निवड झाली आहे.गौरवला क्रीडा शिक्षक संजय त्रिभुवन यांचे मार्गदर्शन लाभले. त्याचप्रमाणे या स्पर्धेत सौ.क.मा.कासलीवाल माध्यमिक विद्यालयातील मुलींच्या संघाने नेत्रदीपक कामगिरी करून तृतीय क्रमांक पटकावला .या यशाबद्दल सर्व खेळाडूंचे व क्रीडा शिक्षक संजय त्रिभुवन यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

शुटिंग बॉल स्पर्धेतील हे उल्लेखनीय यश मिळविल्याबद्दल संस्थेचे चेअरमन मा.श्री.सुनिलकुमार कासलीवाल, उपाध्यक्ष सुशील कासलीवाल, सचिव विजय चोपडा, प्रशासक प्रकाश गुप्ता ,सहसचिव प्रमिला ताई कासलीवाल,विश्वस्त रिखबचंद कासलीवाल,जुगलकिशोर अग्रवाल, महेंद्र चांदिवाल, आनंद कासलीवाल,दिलीप पारख, प्रिन्सिपॉल मनी चावला
मुख्याध्यापक गोरख डफाळ तसेच प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.विशाल सावंत यांनी सर्व खेळाडूंचे व क्रीडा शिक्षक संजय त्रिभुवन यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments