Bay -team aavaj marathi
प्रज्ञानंद (बापू) जाधव पत्रकार नांदगाव (नाशिक)
नांदगाव येथील मविप्र संचलित न्यू इंग्लिश स्कूल नांदगाव या विद्यालयात सन २०२५/२६ या शैक्षणिक वर्षाचा शिक्षक पालक संवाद मिळावा संपन्न झाला. या कार्यक्रमाचा अध्यक्षस्थानी शालेय समिती अध्यक्ष श्री विजय काकळीज होते.व्यासपीठावर विद्यालयाचा मुख्याध्यापिका श्रीमती ज्योती काळे ,पर्यवेक्षक श्री अविनाश शेवाळे ,श्री बैरागी सर, श्रीमती अक्षदा कुलकर्णी, श्रीमती जयश्री बोराडे इ. मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीताने करण्यात आली .
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री अविनाश शेवाळे यांनी केले त्यांनी आपल्या प्रास्ताविकात शिक्षक पालक संवाद मेळाव्याचा उद्देश पालकांसमोर मांडला.
विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक श्री अशोक मार्कंड यांनी सन २०२४/२५ या शैक्षणिक वर्षाचा प्रगतीचा लेखाजोखा पालकांसमोर मांडला. विद्यालयाच्या शैक्षणिक प्रगतीचा आलेख कसा उंचावत आहे हे त्यांनी पालकांना पटवून दिले. पालक मनोगतात श्री भारत वाघमारे ,श्री सचिन पवार, श्रीमती अक्षदा कुलकर्णी यांनी आपले विद्यालय प्रती मनोगत व्यक्त केले. विद्यालयाचा मुख्याध्यापिका श्रीमती ज्योती काळे यांनी आपल्या मनोगतात शिक्षणाचा रथ सुरळीत चालण्यासाठी व मुलांचा सर्वांगीण विकास होण्याकरिता पालक व शिक्षक यांच्यात सुसंवाद ,सहकार्य आणि विश्वासाचे नातं निर्माण होणं किती महत्त्वाचं आहे हे सांगितले.
यानंतर विद्यालयाचे उपशिक्षक श्री राजेंद्र कदम व उपशिक्षिका श्रीम. सुनिता निकम यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक पालक संघ व माता पालक संघाची स्थापना करण्यात आली. मविप्र संस्थेचे तालुका संचालक श्री अमित भाऊ पाटील यांनी शिक्षक पालक संघ व माता पालक संघाचा सर्व सदस्यांचे अभिनंदन व शुभेच्छा दिल्या.
अध्यक्षीय मनोगतात श्री विजय काकळीज यांनी शिक्षण ही शाळेची तर जबाबदारी आहेच परंतु पालकांची देखील जबाबदारी आहे. पालक देखील विद्यार्थ्यांचा प्रगतीचा महत्त्वाचा घटक आहे. शिक्षक, पालक, आणि विद्यार्थी तीन विद्यार्थी प्रगतीचे स्तंभ आहेत हे त्यांनी सांगितले. स्वागतगीत व ईशस्तवन विद्यालयाच्या संगीत शिक्षिका श्रीमती कल्पना अहिरे व गीतमंच यांनी सादर केले. हा कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शरद आहेर तर आभार प्रदर्शन बाळासाहेब कवडे यांनी केले.
0 Comments