Bay- team aavaj marathi
प्रज्ञानंद बापू जाधव पत्रकार नांदगाव (नाशिक)
मविप्र संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल नांदगाव या विद्यालयात सन 2025/ 26 या शैक्षणिक वर्षासाठी विज्ञान छंद मंडळाची स्थापना करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका संचालक श्री अमित भाऊ पाटील व्यासपीठावर श्री विजय काकळीज, बाळासाहेब कदम, राजेश पाटील, मुख्याध्यापिका ज्योती काळे,पर्यवेक्षक अविनाश शेवाळे होते.
कार्यक्रमाचे सुरुवात स्वागत गीताने करण्यात आली. पर्यवेक्षक अविनाश शेवाळे यांनी प्रास्ताविकातून विज्ञान छंद मंडळ व महत्त्व स्पष्ट केले. मान्यवरांचा हस्ते दीप प्रज्वलन व डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचा पूजन करण्यात आले. अण्णासाहेब दुकळे यांनी विज्ञानातील उद्दिष्ट स्पष्ट केले. गजेंद्र माताडे यांनी मागील वर्षाचा विज्ञान संघ मंडळाचा शैक्षणिक आढावा सांगितला. प्रणोद गोटे यांनी वैज्ञानिक उपकरणांच्या माध्यमातून प्रयोग प्रात्यक्षिक करून दाखवले. गवळी जया, बिडवे सरला, गणेश ढोणे यांच्या मार्गदर्शनाखाली विज्ञान छंद मंडळाची स्थापना झाली.
श्री विजय काकळीज यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवावा या संदर्भात मार्गदर्शन सूचना केल्या. आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये तालुका संचालक श्री. अमित भाऊ पाटील बोलताना विज्ञान छंद मंडळाच्या सर्व सदस्यांना शुभेच्छा दिल्या व विज्ञान हा विद्यार्थ्यांचा प्रगतीचा महत्त्वाचा विषय आहे हे सांगितले.
कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता प्रयोगशाळा परिचर यशवंत काकळीज , विद्यालयातील सर्व शिक्षक,शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाऊसाहेब सोनवणे तर आभार प्रदर्शन नरेंद्र पाटील यांनी केले.
0 Comments