बचत गटाच्या वतीने पोलिस हवा बस्ते यांचा सत्कार

 Bay- team aavaj marathi 

 नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथील खॉजा गरीब नवाज महिला बचत गटाच्या महिलांच्या वतीने येथील जिल्हा परिषदेच्या जिवन शिक्षण शाळेच्या प्रांगणात नांदगाव पोलिस ठाण्याचे बोलठाण बिटचे पोलिस हवालदार भास्कर बस्ते यांचा सत्कार करण्यात आला.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, जातेगाव येथील खॉजा गरीब नवाज महिला बचत गटाच्या सहा महिन्यांपूर्वी अचानक अल्पशा आजाराने विस महिन्यांपूर्वी एका महिला सदस्याचे निधन झाले होते. निधनाच्या आगोदर त्यांनी बचत गटाकडून पाच वर्षांच्या परत फेडीच्या बोलीवर एक लाख रुपये कर्ज घेतले होते. याबाबत त्यांच्या पती आणि सदस्यांना सर्व माहिती होती. मयत महिलेच्या पतीकडे बचत गटाच्या सर्व महिलांनी घेतलेल्या कर्जाची परतफेड करावी. याबाबत सांगण्यासाठी गेल्या असता त्यांना मयत महिलेच्या पतीने घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यास असमर्थता दर्शवली.व सर्व महिलांना शिवीगाळ करत पैसे देणार नाही काय करायचं ते करुन घ्या अशी धमकी दिली होती.

त्यामुळे सर्व महिलांनी नांदगाव पोलिस ठाण्यात त्याची तक्रार दाखल केली होती.त्यावरुन पोलिस हवालदार भास्कर बस्ते यांनी त्या व्यक्तीला बचत गटाकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करणे बाबत समज दिली असता, त्या व्यक्तीने कर्जापोटी ५० हजार रुपये जमा केले. उर्वरित ३० हजार रुपये काही दिवसांत जमा करतो असे सांगितले. पोलिस हवालदार भास्कर बस्ते यांनी केलेल्या मदतीमुळे बचतगटाचे कर्जाचे पैसे वसूल झाल्याने महिलांनी त्यांचे जातेगाव येथील प्राथमिक शाळेत पुष्पगुच्छ शॉल श्रीफळ देऊन सत्कार केला.

यावेळी बचतगटांच्या सदस्यांचे विमा संरक्षण करुनच या पूढे कर्ज वाटप करावे जेने करुन कर्ज वसुलीसाठी वादविवाद होणारं नाही. असे पोलिस हवा बस्ते यांनी उपस्थित महिलांना सांगितले.

Post a Comment

0 Comments