Bay- team aavaj marathi
Dr. शिवचरण हिंगमिरे पत्रकार उमरखेड (यवतमाळ)
राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त उमरखेड शहरात छोट्या व्यवसायीकांची पावसाळ्यात होणारी परवड लक्षात घेऊन त्यांना उन, वारा, पावसापासून संरक्षण मिळावे म्हणून छत्री वितरणाचा महत्वपूर्ण उपक्रम राबविण्यात आला.
त्यात प्रामुख्याने फेरीवाले, छोटे बैठे व्यवसायिक यांना छत्र्यांचे वितरण करण्यात आले. त्यामुळे त्यांना उन वारा पाऊस यांपासून दिवसभर काम करणाऱ्या गरीब व श्रमिक वर्गातील व्यवसायिकांच्या आरोग्याची काळजी लक्षात घेऊन त्यांचे संरक्षण व्हावे हा उद्देश नजरेसमोर ठेवून उपक्रम राबविण्यात आला.
या उपक्रमांचे आयोजन भाजपा यवतमाळ - पुसद जिल्हा समन्वयक नितीन भाऊ भुतडा मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आला. यात शहरातील मुख्य बाजार पेठेतील शेकडो फेरीवाल्यांना, हातगाडी व बैठे व्यवसायिकांना वर्तमान स्थितीतील पावसापासून संरक्षण होणार आहे. अशी भावना या वेळी नितीन भाऊ भुतडा यांनी व्यक्त केली.अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे समाजातील गरजू घटकांपर्यंत मदतीचा हात पोहोचतो, तसेच वाढदिवस साजरा करण्याची एक सामाजिकदृष्ट्या जाणीवपूर्वक आणि सकारात्मक पद्धत निर्माण होते हे या उपक्रमातून अधोरेखित झाले.
या वेळी आ. किसनराव वानखेडे, जिल्हा समन्वयक नितीन भुतडा, माजी आ.नामदेवराव ससाने, तसेच माजी आ. विजयराव खडसे, जिल्हा सरचिटणीस महेश काळेश्वरकर, बळवंतराव नाईक, ॲड. अनिल माने, भाजपा ग्रामिण मंडळ अध्यक्ष विठ्ठल वानखेडे, पुंडलिक कुबडे, ॲड जितेंद्र पवार, माजी नगर उपाध्यक्ष अरविंद भोयर, शहराध्यक्ष अतुल खंदारे, युवा मोर्चा शहर अध्यक्ष पवन मेंढे, अमोल तीवरंगकर, महावीर महाजन,किशोर तिवारी,बाळा दुधेवार, संतोष लुटे,गजानन जगताप,कृष्णा साबळे आदींसह शेकडो लाभार्थी, असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते. लाभार्थ्यांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करून संयोजकांचे आभार मानले.
0 Comments