नांदगाव महाविद्यालयात महिला सबलीकरण कार्यशाळा ‌

 Bay- team aavaj marathi 

सिताराम पिंगळे पत्रकार नांदगाव (नाशिक)

मविप्र समाजाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय नांदगाव येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ गुणवत्ता सुधार योजनेअंतर्गत महिला सबलीकरण व  सक्षमीकरण या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर. एन.भवरे यांनी भूषविले.

या कार्यशाळेत ॲड. मनीषा त्रिभुवन यांनी भारतीय राज्यघटनेत महिलाविषयक कायद्यांची माहिती दिली व महिला व विद्यार्थिनींवर अन्याय झाल्यास कोणकोणते कायदेशीर मार्ग आहेत याविषयी विद्यार्थिनींचे प्रबोधन केले. तसेच कार्यक्रमाचे वक्ते म्हणून डॉ.अर्चना नाईक यांनी महिला व विद्यार्थ्यांनी आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी याविषयी सविस्तर विवेचन केले.या वेळी  नांदगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री दिगंबर भदाणे यांनी समाज माध्यमांचा वापर करताना महिलांनी व विद्यार्थिनींनी कोणती काळजी घ्यावी याविषयी सविस्तर विवेचन केले.

 कार्यशाळेचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर. एन. भवरे यांनी एक सुसंस्कृत समाज घडविण्यासाठी महिला व मुलींचा योग्य सन्मान होणे आवश्यक आहे याविषयी  मार्गदर्शन केले. कार्यशाळेचे प्रास्ताविक डॉ.भारती धोंगडे यांनी केले. या प्रसंगी व्यासपीठावर महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. संजय मराठे, प्रा. एम.बी आटोळे, डॉ.अतुल मदने, श्रीमती सोनाली आवारे उपस्थित होते. कार्यशाळेचे सूत्रसंचालन डॉ. वैशाली गागरे पाटील व आभार प्रदर्शन प्रा. प्राजक्ता पाटील यांनी केले.

Post a Comment

0 Comments