गॅस सिलेंडर वाहतूक करणाऱ्या ट्रक च्या धडकेत दोन दुचाकीस्वार ठार एक गंभीर

 Bay -team aavaj marathi 

Dr.S.B. हिरे पत्रकार कासारी नांदगाव (नाशिक)

 नांदगाव तालुक्यातील कासारी ते बोलठाण रस्त्यावर कासारी गावापासून साधारण दिड किलोमीटर अंतरावर चांदेश्वरी पाझर तलावाजवळ असलेल्या अवघड वळणाजवळ मराठवाड्यातून पाणेवाडी येथे रिकामे गॅस सिलेंडर घेऊन जानार्या  M.H 41. AQ- 8525 या आयशर ट्रकने गुरुवार दि.२४ रोजी सायंकाळी चार ते पाच वाजेच्या दरम्यान समोरच्या दिशेने येणाऱ्या दुचाकी क्रमांक M.h.41. BQ-1723 या स्कुटी गाडीवर कासारी येथील बुधा गोरख मेंगाळ वय २० हा गंभीर जखमी झाला.
अपघातातील आयशर ट्रक आणि जखमी बुधा गोरख मेंगाळ 

याबाबत सविस्तर वृत्त असे की, कासारी गावापासून जवळच येथील बुधा गोरख मेंगाळ वय २० हा गंभीर जखमी झाला असून त्याच्या सोबत अकोला जिल्ह्यातील रहिवासी असलेले त्याचे नातेवाईक राहुल (वय १८) रोहित (वय २२) असे तिघे येत येत असताना त्यांची समोरासमोर धडक झाल्याने वरील तिघांपैकी राहुल (वय १८) रोहित (वय २२) यांच्या दोघांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांचा घटनास्थळी मृत्यू झाला. 

या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी जखमी झालेल्या बुधा गोरख मेंगाळ याचेवर खाजगी दवाखान्यात प्रथमोपचार करून अधिक उपचारासाठी नांदगाव येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविले. तसेच अपघाताची नांदगाव पोलिस ठाण्यात खबर दिली असता तत्काळ पोलीस निरीक्षक दिगंबर भदाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवा. भास्कर बस्ते पोलिस शिपाई परमेश्वर श्रीखंडे आणि इतरांनी घटनास्थळी धाव घेऊन मयत दोन्ही व्यक्तींना रुग्णवाहिकेत ग्रामीण रुग्णालयात पाठविले असून अधिक तपास पोलीस करत आहेत.



Post a Comment

0 Comments