मनमाड जवळ शुक्रवार दि.२५ जुलै रोजी मनमाड शिवार, वागदर्डी रोडवरील आयुष पॅलेस मंगल कार्यालयाजवळ तालुक्यांतीलच पळाशी येथील मेंढपाळ श्री. बाबुलाल अर्जुन बोरकर हे आपल्या मेंढ्यांसह चराईसाठी मनमाड परिसरातील मौजे पाल टाकून थांबलेले असताना दुपारी अंदाजे २.३० ते ३ वाजेच्या सुमारास अचानक झालेल्या विजेच्या कडकडाटात व वादळी हवामानात त्यांच्या अंदाजे सुमारे नऊ वर्ष वयाच्या बैलावर वीज पडली. या दुर्घटनेत एका बैलाचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, यात बाबुलाल बोरकर यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच मंडळ अधिकारी श्री. एस. एम. गुळवे, पशुवैद्यकीय अधिकारी श्रीमती दीपाली खवसे (नागापूर), आणि तलाठी श्री. गणेश भगुरे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली व पंचनामा कार्यवाही पूर्ण केली.
प्रशासनाने शासकीय नियमानुसार नुकसान भरपाई मिळावी यासाठी आवश्यक अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे सादर केला असून, लवकरच मदत मिळेल अशी अपेक्षा आहे. या घटनेमुळे बोरकर कुटुंबीयांवर दु:खाचे सावट पसरले आहे. प्रशासनाने दिलेल्या तत्पर प्रतिसादामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. अशी सविस्तर माहिती वन्य पशु प्राणी मित्र व न्यूज प्रतिनिधी श्री भागवत झाल्टे यांनी दिली
0 Comments