नांदगाव तालुक्यातील मांडवड येथील म.वि.प्र.समाजाचे, स्व. शरद आण्णा आहेर जनता विद्यालयात मुख्याध्यापक थेटे एस. जी.,उपक्रमशील शिक्षक परदेशी एच. टी. क्रीडा शिक्षक आहेर एस.जी यांच्या संकल्पनेतून निवडणूक समिती प्रमुख चोळके के.डी.सातपुते डी.पी.यांच्या प्रयत्नातून लोकशाहीचा सर्वात महत्वाचा घटक निवडणूक प्रक्रियेची विध्यार्थ्यांना माहिती व्हावी व लोकशाही बळकट करण्यासाठी शालेय मंत्रिमंडळ निवडणूक प्रत्यक्ष मोबाईल मधील ईव्हीएम पद्धतीने घेण्यात आली.
या निवडणुकीसाठी निवडणूक कृति कार्यक्रम निश्चित करण्यात आला निवडणूक नियमावली निश्चित करून मतदार पात्रता, उमेदवार पात्रता, आधार कार्ड, ओळखपत्र वैयक्तिक माहिती अशी नियमावली ठरवून १३ पदांसाठी ६० अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी ६ जणांनी माघार घेतली ६ जणांचे अर्ज अपात्र ठरले असे ४८ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले.अर्जाची छाननी करून सर्व उमेदवारांना प्रचार करण्यासाठी वेळ देण्यात आला. उमेदवारांनी मी माझ्या पदाला कशा पद्धतीने न्याय देईल हे विद्यार्थी मतदारांपर्यंत जाऊन आपली भूमिका मांडली.मतदान पारदर्शकपणे व शांततामय मार्गाने पार पडण्यासाठी शाळेतील शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी यांनी महत्वाची भूमिका बजावली.
त्यात मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून मुख्याध्यापक थेटे एस. जी. सह निवडणूक अधिकारी म्हणून श्री. कवडे एस. एस. व मतदान अधिकारी म्हणून लाठे ए.एस.,पाटील एस,आर., सातपुते डी.पी.,वाळके एन.पी., शेख एस. एम.,चोळके के.डी.,चौधरी सर, मोरे एन.के.,श्रीम.अहिरे एम.के., श्रीम. सौंदाणे जे.सी. श्रीम.चव्हाण एस.एम. श्रीम.कवडे एम. एस. श्री.आहेर एन. ए. श्री. रोहित वर्पे यांनी काम पाहिले. मतदान प्रभाविपणे होण्यासाठी मोबाईल मधील ईव्हीएम मध्ये उमेदवार निश्चित करण्यात आले. मतदारांच्या मतदान झाल्यावर बोटाला शाई लावण्यात आली. मतदान करण्यासाठी मतदाराला शालेय ओळखपत्र किंवा आधारकार्ड वापरण्यात आले.मतदान पुर्ण झाल्यानंतर मतदान निर्णय अधिकारी यांनी मतदान प्रतिनिधी व मतदान अधिकारी यांनी त्याच दिवशी मोबाईल मधील ईव्हीएम मध्ये नोंद झालेली मतदानाची मतमोजणी केली.माईक च्या साहाय्याने प्रत्येक मंत्री मंडळातील उमेदवाराचा निकाल जाहीर केला. यामध्ये शालेय मंत्रिमंडळात खालील पदनिहाय उमेदवार निवडून आले.
वरील निवडून आलेल्या सर्व उमेदवारांचा "शपथविधी कार्यक्रम" घेण्यात आला. व निवडून आलेल्या उमेदवाराला त्यांच्या पदाची शपथ देण्यात आली तसेच गुलाब पुष्प देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
या सर्व उमेदवारांचे संस्थेचे सरचिटणीस मा.ॲड.नितिन ठाकरे साहेब,तालुका संचालक मा.इंजि. अमित भाऊ बोरसे (पाटील), शालेय स्कूल कमिटी अध्यक्ष श्री.प्रशांत भाऊ आहेर,परिसरातील पालकांनी अभिनंदन केले. संपूर्ण मतदान यशस्वीरित्या पार पडण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
0 Comments